Friday, November 8, 2019

माझी लेक खूप गोड

➖➖ माझी लेक खूप गोड ➖➖

माझी लेक खूप गोड । जशी पेरूची ती फोड
सुखी संसाराला जोड । जन्म तिचा भाग्याचा !! १ !!

होता एक महिन्याची । घाई झाली बारश्याची
असे लाडकी साऱ्यांची । नाव ठेवा आनंदी !! २ !!

दुडूदुडू धाव घेता । हाक आई बाबा देता
तिला फिरावया नेता । होतो हर्ष अमाप !! ३ !!

घ्यावे शिक्षण अमाप । घडो हातूनी प्रताप
खंदा आहे तिचा बाप । स्वप्न पूर्ण कराया !! ४ !!

मोठी होई जशी जशी । सुवर्ण बावन्नकशी
तीच रवी तीच शशी । गर्व मजला तिचा !! ५ !!

हात होतील पिवळे । थाटामाटात सोहळे
कसा देऊ बळेबळे । सांगा निरोप तिला !! ६ !!

होवो संसार सुखाचा । पडो विसर दुःखाचा
क्लेश नकोच फुकाचा । कधी जीवनी तिच्या !! ७ !!

🍃🍃 सागरराजे निंबाळकर 🍃🍃

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !