अष्टाक्षरी चारोळी - 8
तिच्या मनात होकार
ओठांवर होतं नाही
खेळ सारा नियतीचा
दोष नव्हता तिचाही
▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
अष्टाक्षरी चारोळी - 8
तिच्या मनात होकार
ओठांवर होतं नाही
खेळ सारा नियतीचा
दोष नव्हता तिचाही
▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
अष्टाक्षरी चारोळी - 7
आयुष्याच्या नौकेवर
स्वार झाली स्वप्न सारी
त्यांच्या स्वागतासाठी मी
उभा केव्हाचा किनारी
▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
अष्टाक्षरी चारोळी - 6
नात्यांमध्ये नेहमी जी
होती पक्की व्यवहारी
जाताजाता आठवांची
तिने ठेवली उधारी
▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
अष्टाक्षरी चारोळी - 5
शक्य होते खूप काही
तुझ्या एका होकाराने
दूर गेलीस निघून
जेव्हा जड पावलाने
▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
अष्टाक्षरी चारोळी - 4
जास्त काही नको मज
हवा थोडासा जिव्हाळा
तुला निरोप देताना
जर दाटला उमाळा
▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
अष्टाक्षरी चारोळी - 3
जरी नसली ठाऊक
मज दिशा प्रवासाची
तरी ठेवतो तयारी
निरंतर चालण्याची
▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
अष्टाक्षरी चारोळी - 2
तुझ्या आठवांचे ढग
पुढे जाती हळूहळू
माझे मलाच कळेना
त्यांच्यामागे किती पळू
▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
अष्टाक्षरी चारोळी - 1
कणखर जरी वर
खूप तुटतो आतून
जेव्हा रडणे टाळतो
बाप धाय मोकलून
▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
▪️थोडे ठेवतो अंतर
नका विचारू त्यावेळी
काय वाटते जीवाला
जेव्हा क्षणात निरोप
द्यावा लागतो कुणाला
तसा सोबती कायम
येथ नसतो कुणीही
मनाजोगे वाटताना
होते काहीही, कधीही
कधी सांगावा एखादा
कधी भेट अचानक
काय बोलावे कुणाला
जो-तो मर्जीचा मालक
चालताना नकळत
सुटलाच कधी हात
कैक होतात जखमा
खोलवर काळजात
म्हणूनच आता मीही
थोडे ठेवतो अंतर
होत नाही मग त्रास
हात सुटल्यानंतर
▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर