Sunday, November 10, 2019

नशिबाच्या पुढे चालते कुणाचे (१४ अक्षरी गीत)

--- नशिबाच्या पुढे चालते कुणाचे ---

नशिबाच्या पुढे सांगा, चालते कुणाचे
चांगले वाईट सारे, समज मनाचे !! धृ !!

होता काही वेगळाले, देती त्याला दोष
त्यानेही कितीदा मग, ओढवावा रोष
हात पाय नाही ज्याला, त्याचेही नशीब
धडधाकट मग का, लावती रतीब

भाळी लिहिलेले आहे, भोग प्रत्येकाचे !! १ !!

साथ मज पदोपदी, नशिबाने दिली
विसरू कशी आईची, वेदना पहिली
साऱ्यास मिळाला येथे, मायेचा सहारा
नशिबाचा होता जेथे, अखंड पहारा

जुळाले अतूट पहा, धागे जीवनाचे !! २ !!

नशिबाला दोष नको, श्रद्धा ज्याची त्याची
शरदाच्या चांदण्यात, मूर्ती कैवल्याची
नशिबानेच मिळतो, अवघा प्रपंच
कामी येतो एकांतात, आठवांचा संच

नशीब दावते मज, दिवस सुखाचे !! ३ !!

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !