Sunday, October 13, 2024

दुःख त्यालाच कळतं

अपेक्षाभंग होतो ज्याचा
दुःख त्यालाच कळतं 

शल्य मनाला रात्रीसोबत 
दिवसासुद्धा छळतं 

~ सागरराजे निंबाळकर 

Sunday, August 18, 2024

समाधी

मरता येत नाही म्हणून जगणं आणि दुःख लपवून सगळं बघणं याला "समाधी" म्हणता येईल का?

पेराल तेच उगवतं

"जे पेराल तेच उगवतं" असं अनेकजण सांगून गेले आहेत

मग आपण प्रेम केल्यावर, जीव लावल्यावर, काळजी घेतल्यावर हेच सर्व आपल्याला परत का नाही मिळत?

विरह

जीवनाच्या थोडंसं पलीकडे आणि मृत्यूच्या थोडंसं अलीकडे जी अवस्था असते तिलाच "विरह" म्हणतात

Saturday, August 17, 2024

चांदण्याही

चांदण्याही आता 
पूर्वीसारख्या लुकलुकत नाहीत

चंद्र हरवला की ढग दाटले
कारण, त्यांचं त्यांनाच माहीत

~ सागर

Monday, July 29, 2024

शिकतो आहे

~ शिकतो आहे

नावापुरते जगतो आहे 
दुःखामध्ये बुडतो आहे

गर्दीमध्ये नात्यांच्या मी
पुन्हा एकटा पडतो आहे

हाक दिली की जातो धावत
इथेच तर मी फसतो आहे

जीव जाईल बहुदा आता
हल्ली इतका झुरतो आहे

नकोस ढाळू अश्रू वेड्या
स्वतः स्वतःला म्हणतो आहे

केवळ पणत्या जळत नाहीत
बघा.. दिवाही जळतो आहे

पंगत आहे श्रीमंतांची
इथे कुठे तू बसतो आहे

मेल्यावरही सुटला नाही
आत्मा इथेच फिरतो आहे

हसवत होता सर्वांना जो
तोच नेमका रडतो आहे

कुणी कुणाचा नसतो सागर
रोज नव्याने शिकतो आहे

~ सागर निंबाळकर

Monday, July 22, 2024

भास होत आहे

आता जातोय जिथे-जिथे
तिथे तुझाच भास होत आहे
बाकी ठीक आहे तसा मी
इतकाच काय तो त्रास होत आहे

येशील आज न उद्या माघारी
मनाने आस धरली आहे 
लवकरात लवकर व्हावं सगळं
इच्छा एवढीच उरली आहे 

~ सागर

Sunday, July 14, 2024

सुंदर जोडा

~ सुंदर जोडा..

हळूहळू का, होईना पण..
नाते अपुले, होवो स्थावर
तयार आहे, झेलाया मी
आसवे तुझी, तळहातावर

श्रावणातल्या, सरींसारखा 
असतो वावर, सुखदुःखांचा 
जन्म जरी हा, एक लाभला
संसार करू, युगायुगांचा

रुसवे-फुगवे, सोडू आता
लक्ष्य आपले, छोटे नाही
दुर्लक्ष जरा, करशील ना तू 
चुकले जर का, माझे काही

तुझी सावली, होण्यासाठी
जळेन मीही, उन्हात थोडा
दिसेल शोभून, लाखामध्ये
तुझा नि माझा, सुंदर जोडा

वात दिव्याची, झाली जर तू
तेल त्यातले, असेल "सागर"
पार्वती तुझे, नाव ठेवतो
म्हणशील मला? भोळा शंकर

~ सागरराजे निंबाळकर

Sunday, July 7, 2024

सवाल

किसीके दिल को छू जाऊ
इतनी कहाँ मजाल मुझमें

ढूँढ रहा हूँ जवाब उसका
छिपा है जो सवाल मुझमें

~ सागरराजे

Friday, July 5, 2024

कळेना नेमके कारण

~ कळेना नेमके कारण

सुटेना पेच हा आता मरावे की जगावे मी
कळेना नेमके कारण किती अन् का झुरावे मी

तुझ्या पश्चात जगणे हे निरर्थक वाटते राणी
लिहावी कोणती कविता कुणाचे गीत गावे मी

मला दे दुःख तू सगळे नको पर्वा कशाचीही
मलाही वाटते कायम तुझ्या कामास यावे मी

उजेडाची सवय जडली अता अंधार सोसेना
उद्याचे स्वप्न सोनेरी कसे, केव्हा पहावे मी

कधी हसते, कधी रडते छटा लाखो मनाच्या या
अशा पेचातुनी कुठवर स्वतःला सोडवावे मी

🧿 सागरराजे निंबाळकर

Thursday, July 4, 2024

विरासत

कत्ल कर दिया अरमानों का
तब जिंदगी का गुलिस्ताँ खिला है

दोबारा ना पुछना साहब हमें
विरासत में क्या मिला है

~ सागरराजे

Friday, May 24, 2024

काय नेमके

काय नेमके, असेल कारण
सावलीतही, ऊन भासते

जवळ करेना, आज मला ती
एरव्ही जसा, जीव लावते

~ सागरराजे निंबाळकर

सवलत द्यावी

वाटत आहे, आता सारखे
दुःखाने या, सवलत द्यावी

रात्र जशी ही, शीतल असते 
सकाळसुद्धा, तशीच यावी

~ सागरराजे निंबाळकर

Saturday, May 18, 2024

पत्र निनावी

~ पत्र निनावी 

आयुष्याच्या, वाटेवरती
पडझड कायम, होतच असते 
सावरण्याला, पुन्हा नव्याने
केवळ थोडे, धैर्य लागते

हरूनही जो, जिंकत जातो
सलाम करते, दुनिया त्याला
भाग्यासोबत, कर्मही हवे
ध्येय गाठतो, कळते ज्याला

रडणे-हसणे, पडणे-उठणे
आयुष्याचा, खेळ निराळा
आनंदाला, कवेत घ्या अन् 
दुःखाला या, नकळत गाळा 

छळले जर का, एकांताने 
विविध रसांची, गाणी गावी
हवा कशाला, पत्ता कुठला
लिहू एकदा, पत्र निनावी

~ सागरराजे निंबाळकर

Wednesday, May 15, 2024

एक कोपरा

एक कोपरा, काळजातला
तुझ्याचसाठी, होतो हळवा 

क्षणात असतो, तप्त उन्हाळा
क्षणात होतो, वसंत हिरवा

~ सागरराजे निंबाळकर

Saturday, April 20, 2024

अल्फाज मेरे

अल्फाज पढ़ लेती है वो मेरे
मगर, जज़्बात नहीं समझ पाती

फिर भी एक साथ है हम
जैसे होते हैं दिया और बाती

@ सागरराजे निंबालकर

गले लग जाता हूं

खामियां यकीनन होंगी मुझमें
मगर, रिश्ता अच्छे से निभाता हूं

कभी उसे कहता हूं लग जा गले
कभी खुद गले लग जाता हूं

@ सागरराजे निंबालकर


इसी अदा पे

बहस कितनी भी हो दोनो में
आखिर वो दिल से लगाती है 

इसी अदा पे तो फिदा हूं 
जो दिल को सुकून दिलाती है

@ सागरराजे निंबालकर

Sunday, January 21, 2024

वहीत माझ्या

~ वहीत माझ्या

अधूनमधून सुचते काही
बाकी विशेष नसते काही

प्रेम वेगळे केले जर का
माझ्या-तुझ्यात उरते काही?

हसशील किती खोटेनाटे
नजरेमधून सुटते काही?

केले नसते दुर्लक्षित जर..
वाद वाढले असते काही

येते काही ओठांवर तर..
ओठांमागे लपते काही

हळवा होतो जेव्हा-जेव्हा
वहीत माझ्या भिजते काही

धाव जरासा काळासोबत
एकाजागी मिळते काही?

▪️सागरराजे निंबाळकर