Tuesday, February 25, 2025

केली फसगत

आयुष्याने केली फसगत प्रत्येकाची
उरली मागे अवघी दौलत प्रत्येकाची

पूर्णत्वाला जाता-जाता चुकली सारी 
प्रेमामधली गणिते नकळत प्रत्येकाची

फितुरीसुद्धा मागे हटली रांगेमधुनी 
निष्ठा इतकी आहे हरवत प्रत्येकाची

सरणावरती दिसली गर्दी तेव्हा कळले 
गेली स्वप्ने रांगत-पांगत प्रत्येकाची

झोळी पसरत या विश्वाचा स्वामी म्हणतो 
आई म्हणजे आहे बरकत प्रत्येकाची

~ सागरराजे निंबाळकर