🌿 कळलेच नाही..
मनाचे खेळ न्यारे कधी कळलेच नाही
कुणाला काय सांगू मला सुचलेच नाही
खरेतर खूप काही मनी मी योजलेले
करावे काय आधी कधी ठरलेच नाही
तिच्या पत्रात असते सदा ख्याली-खुशाली
तिला जे दुःख सलते तिने लिहलेच नाही
ठरवतो सर्व काही करूया छान आता
तरी का ऐनवेळी तसे जमलेच नाही
दिले होते मला जे मनापासून अगदी
तुझे ते प्रेम राणी पुन्हा दिसलेच नाही
↪️ सागरराजे निंबाळकर