🫱🏻🫲🏻 स्वागत आहे..
करू नको तू माझ्यानंतर जवळ कुणाला
तुझाच होतो तुझाच आहे सांग जगाला
कधी न झाली एकमताने चर्चा अमुची
शत्रूत्वाचा मात्र "सारखा" शाप मिळाला
जमेल तेव्हा यावे, जावे स्वागत आहे
नाही माझ्या तसे कुठेही दार घराला
कट्टरतेची व्याख्या म्हणजे "शंभूराजे"
झुकले नाही जरी लागले प्राण पणाला
कशी लिहावी गझल नेमकी शिकतो आहे
कधी ना कधी भिडेल माझा शेर मनाला
🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
मो - ८८ ७९८९ ७७९७