Monday, December 28, 2020

प्रसिद्धीच्या झोतात

➖➖ *विचारधन - ३८* ➖➖

प्रसिद्धीच्या 'झोतात' आणि ज्ञानियांच्या 'गोटात' 'संयम' ढळला तर आपली अधोगती नक्की समजावी !

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Sunday, December 27, 2020

गोष्ट हलक्यात घेतो

➖➖ *विचारधन - ३७* ➖➖

एखादी गोष्ट आपण जेवढी 'हलक्यात' घेतो तेवढं तिचं 'ओझं' वाढत जातं.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Saturday, December 26, 2020

बदल करणं, स्वीकारणं

➖➖ *विचारधन - ३६* ➖➖

बदल 'करणं' किंवा झालेले/होणारे बदल 'स्वीकारणं' ज्याला जमतं त्याची आयुष्याबद्दल तक्रार उरत नाही.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Friday, December 25, 2020

वंचित राहिले दोघे

आजन्म भोगून यातना फक्त
सुखापासून वंचित राहिले दोघे

तरी एक भाबडी आशा मनी
कधी होईल अपुल्या मनाजोगे?

▪️सागरराजे निंबाळकर

माघार आणि तडजोड

➖➖ *विचारधन - ३५* ➖➖

बिकट प्रसंगात 'माघार' घेण्यापेक्षा 'तडजोड' करणं केव्हाही उत्तम. 

माघार घेतल्याने विषय जागेवर संपतो. पण, तडजोडीतून काहीतरी चांगलं होण्याची शक्यता वाढते.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Thursday, December 24, 2020

वावर अवतीभवती

नकोसा वाटतो अता मला
तुझा वावर अवतीभवती

ऐकावं लागेल एकदिवस हे
अशी कल्पनाही केली नव्हती

▪️सागरराजे निंबाळकर

जनसंपर्क

➖➖ *विचारधन - ३४* ➖➖

आपला 'जनसंपर्क' किती मोठा आहे हे महत्त्वाचं नसून त्यातले 'कितीजण' आपल्याशी 'संपर्क' ठेवतात ते महत्वाचं आहे.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Wednesday, December 23, 2020

वाटचाल संयमाने

बदलून जातं आयुष्य अपुलं
केवळ एका योग्य निर्णयाने

यश हमखास मिळतं जीवनी
जर केली वाटचाल संयमाने

▪️सागरराजे निंबाळकर

नजरेतले भाव

➖➖ *विचारधन - ३३* ➖➖

जर आपल्याला एखाद्याच्या चेहऱ्यावरचे/नजरेतले भाव ओळखता आले तर, त्या व्यक्तीची आस्थेने विचारपूस करावी. आपले दोन शब्द दिलासादायक ठरतात.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Tuesday, December 22, 2020

संवादाचे धागे

पुढे सरसावणारे हात
अचानक झाले मागे

जेव्हा, क्षणभर का होईना
पण, उसवले संवादाचे धागे

@ सागरराजे निंबाळकर

प्रगल्भता

➖➖ *विचारधन - ३२* ➖➖

'काहीतरी' करण्याच्या नादात 'काहीही' होऊ न देण्याची काळजी घेणं म्हणजे प्रगल्भता.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Monday, December 21, 2020

जगून झाले

------- जगून झाले -------

उरले अता न काही सारे बघून झाले
नव्हते करायचे जे तेही करून झाले

मरणास पाहिले मी तेव्हा कुठे कळाले
(सारेच वाद माझ्या जगण्यावरून झाले)

भावार्थ मांडताना पुरतात दोन ओळी
सोडव तिढा तुझा तू माझे लिहून झाले

चिंता अता न काही येवो मरण कधीही
ठरले जगावयाचे तितके जगून झाले

नुकसान होत नाही दारूमुळे कधीही
देशात राजकारण पाण्यावरून झाले

@ सागरराजे निंबाळकर

मनाची तयारी

➖➖ *विचारधन - ३१* ➖➖

'मनाची तयारी' ही अशी तयारी आहे जी 'ज्याची त्यालाच' करावी लागते.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Sunday, December 20, 2020

लेखणीचे भोई

▪️लेखणीचे भोई ▪️

आवाज चढवला म्हणजे
कविता प्रसिद्ध होत नाही
थोडा का होईना पण वाव
द्यावा लागतो आशयालाही

किती दिवस ठेवणार अशी
एकमेकांच्या सणांवर बोटं
एकदा पडताळूनही घ्यावं
काय खरं नि काय खोटं

देहविक्री, बलात्कार, शोषण
यापलीकडेही जाऊ शकते कविता
हळव्या काळजाचं चित्र एखादं
जर रेखाटलं, लिहिता लिहिता

प्रतिमा नि अलंकारासोबत
वास्तवही नक्कीच सांगू
मग बघा, बाळ कवितेचं
वेळेआधीच लागेल रांगू

रसिक म्हणून ठेवू नये
केंद्रस्थानी विशिष्ट वर्ग
व्यथा, विरह, आक्रोश
अन कविताच आहे स्वर्ग

सजवून पालखी अक्षरांची
होऊया लेखणीचे भोई
खोवला जाईल सन्मानाने
पुरस्कार प्रत्येकाच्या डोई

▪️ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

चर्चेचा शेवट गप्पांनी

➖➖ *विचारधन - ३०* ➖➖

जेव्हा दोन व्यक्तीतल्या 'चर्चेचा' शेवट 'गप्पांनी' होतो तेव्हा, ते खऱ्या अर्थाने 'एकमेकांच्या जवळ' आलेले असतात.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Saturday, December 19, 2020

प्राधान्यक्रम

➖➖ *विचारधन - २९* ➖➖

जोवर आपण एखाद्याच्या 'प्राधान्यक्रमात' बसत नाही तोवर, त्या व्यक्तीच्या लेखी आपण असलो काय, नसलो काय सारं सारखंच !

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Friday, December 18, 2020

विकत घेतलं दुःखाने

विकत घेतलंय मला दुःखाने
लावून त्याच्या मनाजोगी बोली

तेव्हापासून झाला निस्तेज चेहरा
अन, पापणीही होईना ओली

@ सागरराजे निंबाळकर

एकटं पडायला होतं

का जाणे हल्ली गर्दीतही
एकटं पडायला होतं

हसतोही एका क्षणाला पण
दुसऱ्याच क्षणाला रडायला होतं

@ सागरराजे निंबाळकर

वेडी राधा

श्याम मुरारी झालो सये मी
तू होशील ना वेडी राधा?

अलिखित का होईना पण
करूयात करार एखादा

@ सागरराजे निंबाळकर

दिवसाही तारे

➖➖ *विचारधन - २८* ➖➖

'पद' आणि 'प्रतिष्ठा' जीवापाड प्रिय असल्यास ती जपण्यास आजन्म प्रयत्नशील राहावे. 
अन्यथा दिसणाऱ्याला 'दिवसाही तारे' दिसतात. 

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Thursday, December 17, 2020

शिंपित जा तू किस्से

निजताना चांदणे ओढू

शपथ माझी, तुम्हा दिलवरा
धीर, इतक्यात नका ना सोडू

होईल धरा ही शय्या अपुली
निजताना चांदणे ओढू

@ सागरराजे निंबाळकर

निर्णय घेताना

➖➖ *विचारधन - २७* ➖➖

'आयुष्यात' आणि 'आवेशात' कोणताही निर्णय घेताना किमान दोनवेळा विचार करावा. 
'पश्चात्तापाच्या धडकेने' 'कपाळमोक्ष' होण्याची वेळ येत नाही. 

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Wednesday, December 16, 2020

चारोळी

हळूहळू का होईना, गगनाला 
भिडू पाहत होत्या वेली 

तेवढ्यात परंपरांच्या कोयत्याने 
त्यांची मुळासकट कत्तल केली 

@ सागरराजे निंबाळकर

ज्ञानामृत गंगा

------- ज्ञानामृत गंगा -------

अधिकारवाणी । मिळते ज्ञानाने
जपावी कर्माने । नित्य तिला ।।१।।

असावे लागते । सारे सुसंगत 
तेव्हाच रंगत । येते खरी ।।२।।

क्षणिक मोहाने । तृष्णा का भागते 
करावी लागते । तपश्चर्या ।।३।।

अपत्य अपुले । साऱ्यांनाच प्रिय 
करावे सक्रिय । त्याचे त्याला ।।४।।

सोपे नाही येथे । हवे ते साधणे 
निष्फळ कारणे । पुरे आता ।।५।।

वाहू द्यावी दारी । ज्ञानामृत गंगा 
भुलू नये रंगा । प्रसिद्धीच्या ।।६।।

संयमाने मोजा । सागराची खोली 
होऊ नये ओली । काया फक्त ।।७।।

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर 
मो - ८८७९८९७७९७

नजरेतून पडू नका

➖➖ *विचारधन - २६* ➖➖

चालताना घसरून पडा, एखाद्याच्या प्रेमात पडा, तंटा सोडवण्यास मध्ये पडा, झोपण्यासाठी जमिनीवर पडा पण कोणाच्या 'नजरेतून' कधीच 'पडू नका'.
उठून उभं राहण्यात आयुष्य जातं.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Tuesday, December 15, 2020

व्हावे लीन चरणात

-- व्हावे लीन चरणात --

कधीकधी मनाजोगे
कधी विरुद्ध वागतो
थांग अपुल्या मनाचा
सांगा, कुणाला लागतो

आवडती येथ साऱ्या
फक्त कौतुकाचे बोल
बीज लटक्या शब्दांचे
किती रुजले सखोल

वाटे हरेका, चुकांचा
कोणी वाचू नये पाढा
जरी दडलेला त्यात
अर्थ बदलांचा गाढा

नको शिष्यत्व कुणाही
जो-तो मर्जीचा मालक
सृष्टी वेगळाली त्याची
तोच नित्याचा चालक

कर्म करत राहावे
चिंता नसावी फळाची
सदा जिंकती लव्हाळे
हार होते वादळाची

ओळखावे ज्याचे त्याने
हित नेमके कशात
गुरू करुनी एखादा
व्हावे लीन चरणात

➡️ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

सिद्ध, प्रसिद्ध

➖➖ *विचारधन - २५* ➖➖

क्षेत्र कोणतंही असो, जोवर आपण स्वतःला 'सिद्ध' करत नाही तोवर 'प्रसिद्ध' होता येत नाही.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Monday, December 14, 2020

फायदा, तोटा

➖➖ *विचारधन - २४* ➖➖

प्रत्येक गोष्टीत 'फायदा' आणि 'तोटा' दोन्ही असतं. आपण ठरवायचं कशावर लक्ष केंद्रित करायचं ते.
कारलं जिभेसाठी कडू आहे मात्र आरोग्यासाठी उत्तम !

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Sunday, December 13, 2020

ज्याला जे हवे ते

------- ज्याला जे हवे ते -------

ज्याला जे हवे ते । देऊन टाकावे
कधी न राखावे । हाती काही ।।१।।

कोरले जातात । हृदयी सखोल
कौतुकाचे बोल । प्रत्येकाच्या ।।२।।

मधुर शब्दांची । करू उधळण
आनंदते मन । क्षणार्धात ।।३।।

गुण-दोषांचीये । नको विवरण
होती अकारण । दुःखी काही ।।४।।

काय करणार । एकटा पामर
सुखांचा सागर । भरावया ।।५।।

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

अडचणींचा पाढा

➖➖ *विचारधन - २३* ➖➖

'अडचणींचा पाढा' हा एकमेव पाढा आहे जो सगळ्यांना 'वाचता' येतो.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Saturday, December 12, 2020

आततायीपणा

➖➖ *विचारधन - २२* ➖➖

कोणतंही 'नवीन नातं' जोडल्यावर त्या नात्याला आकार घेण्यासाठी पुरेसा 'वेळ' द्या. 'आततायीपणा' त्या नात्यात 'वितुष्ट' आणू शकतो किंवा कायमचं संपवू शकतो.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Friday, December 11, 2020

नाण्याच्या दोन्ही बाजू

➖➖ *विचारधन - २०* ➖➖

आपल्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणं ही गोष्ट चांगलीही आहे आणि वाईटही.
याच उक्तीप्रमाणे, कोणतीही कृती करताना 'नाण्याच्या दोन्ही बाजूंचा विचार' करावा.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

आनंदाचं कारण

➖➖ *विचारधन - २१* ➖➖

कधीकधी काही गोष्टी 'कारण नसतानाही' करून पाहाव्यात.
त्याच आपल्या 'आनंदाचं कारण' बनतात.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Wednesday, December 9, 2020

डोळे खरंच बोलतात

➖➖ *विचारधन - १९* ➖➖

चेहऱ्यावर शेकडो सौंदर्यप्रसाधने वापरून एकवेळ तेज आणता येईल पण डोळ्यांचं काहीच करता येत नाही.
ते नेहमी खरंच बोलतात !

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Tuesday, December 8, 2020

मनावर ताबा

➖➖ *विचारधन - १८* ➖➖

कोणत्या गोष्टीचा 'संचय' करायचा आणि कोणती 'त्यागायची' हे जेव्हा आपल्याला कळू लागतं, तेव्हा थोडा का होईना 'मनावर ताबा' मिळवण्यात यश येत जातं.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Sunday, December 6, 2020

नेतृत्वाचा हक्कदार

➖➖ *विचारधन - १६* ➖➖

जो स्वतःची 'प्रगती' होत असताना इतरांनाही पुढे/सोबत घेऊन जातो तोच खरा 'नेतृत्वाचा' हक्कदार.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Saturday, December 5, 2020

एवढंच जवळ जावं

➖➖ *विचारधन - १५* ➖➖

एखाद्या व्यक्तीच्या एवढंच जवळ जावं, जेवढं ती दूर गेल्यावर होणारा त्रास सहन करता येईल.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Friday, December 4, 2020

उकळलेलं पाणी

➖➖ *विचारधन - १४* ➖➖

उकळलेलं पाणीही वाऱ्याच्या संपर्कात येऊन काही वेळाने थंड होतं. याच नियमानुसार तापट स्वभावाच्या व्यक्तीच्या आयुष्यात एखादी शांत, संयमी व्यक्ती असणं गरजेचं आहे.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Thursday, December 3, 2020

गृहीत धरतो

➖➖ *विचारधन - १३* ➖➖

जेवढं आपण एखाद्याला गृहीत धरतो, तेवढा आपला संवाद कमी होऊन आपण त्या व्यक्तीपासून दूर जातो.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Wednesday, December 2, 2020

शब्द कमी पडायचे

शब्द कमी पडायचे एकेकाळी
यंदा मात्र, डोळ्यांनी बोलणं झालं

कुणीतरी दूर गेलंय आपल्यापासून
जरा, उशिराच ध्यानात आलं

🏌🏻‍♂️ सागरराजे निंबाळकर

संयम

➖➖ *विचारधन - १२* ➖➖

एखादं मोठं 'संकट' असो वा उत्सुकतेचा प्रसंग, जर आपण 'संयम' राखू शकलो तर गोष्टी सहज, सोप्या होतात.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

अनुभव नावाचा गुरू

➖➖ *विचारधन - ६* ➖➖

कोणाला जवळ करायचं, कोणाला नाही हे मन ठरवू शकत नसल्यास 'अनुभव' नावाच्या गुरूला शरण जाणं केव्हाही हितावह !

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

छोटा पराभव

➖➖ *विचारधन - ७* ➖➖

जर एखादा छोटा 'पराभवही' जिव्हारी लागत असेल तर 'ईर्षेने' आपल्यावर 'विजय' मिळवला आहे असं समजावं.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

निरागस बालपण

➖➖ *विचारधन - ११* ➖➖

जे आपल्या मनात आहे तेच जेव्हा आपल्या ओठांवर येतं तेव्हा आपण निरागस बालपण जगत आहोत असं समजावं.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Sunday, November 29, 2020

अडचणीतही सुख

➖➖ *विचारधन - १०* ➖➖

प्रत्येकाला काही न काही 'अडचण' असतेच. पण, जोवर आपण अडचणीतही 'सुख', 'समाधान' शोधायचा प्रयत्न करीत नाही तोवर आपला वर्तमान, भविष्य दुःखांच्या अधीन असतं यात शंका नाही !

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Tuesday, November 24, 2020

अपेक्षा आणि इच्छा

➖➖ *विचारधन - ९* ➖➖

'अपेक्षा' आणि 'इच्छा' या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे कोणतंही नवीन नातं जोडताना या गोष्टीत भावनेचा गुंता करू नये.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Friday, November 20, 2020

पाऊसधारा

----- पाऊस धारा -----

घनात नित्य
जलदांचा पहारा
पाऊस धारा

ओशाळलेला
चिंब सरींनी वारा
पाऊस धारा

पाऊस धारा
बागेतल्या फुलांना
देती निवारा

पाऊस धारा
चैतन्य वसंतात
मोद नभात

पाऊस धारा
सृष्टीचा आशिर्वच
रक्षा कवच

@ सागरराजे निंबाळकर

वादळ

आले समीप
घोंगावते वादळ
यत्न निष्फळ

हवाहवासा
कायेवर शहारा
पाऊसधारा

जमिनीमध्ये
एक दाणा पेरला
वृक्ष जाहला

गेला पतंग
उंच उंच उडत
स्पर्धा करत

@ सागरराजे निंबाळकर

पश्चातापाचा विक्रीकर

➖➖ *विचारधन - ६* ➖➖

माणुसकीच्या बाजारपेठेत 'तत्त्वांच्या' शिक्क्याखाली 'अहंकार' विकायचा असल्यास त्यावर 'पश्चात्तापाचा' विक्रीकर भरावा लागतो.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Thursday, November 19, 2020

समृद्ध होणे

➖➖ *विचारधन - ५* ➖➖

कोणत्याही गोष्टीचं निरीक्षण करणं आणि निरीक्षण करून ती आत्मसात करणं यादरम्यान होणाऱ्या प्रक्रियेला 'समृद्ध होणे' म्हणतात.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Wednesday, November 18, 2020

दिवाळी

रोषणाईने
दिपून गेले डोळे
होऊन ओले

दाह सोसून
प्रकाश देती वाती
दुसऱ्यांसाठी

दोन घासांचा
दीपावली फराळ
जोडतो नाळ

@ सागरराजे निंबाळकर

Tuesday, November 17, 2020

जास्तीत जास्त...

➖➖ *विचारधन - ४* ➖➖

कोणतीही गोष्ट करताना जास्तीत जास्त काय होऊ शकतं हा विचार केल्यास त्यातील नुकसान आणि नफा तात्काळ लक्षात येतो.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Sunday, November 15, 2020

अपेक्षांचं ओझं

➖➖ *विचारधन - २* ➖➖

अपेक्षांच्या ओझ्यामुळे आपलं ध्येय दबलं जात असल्यास, 'समाधानाचे पंख' लावण्याची आवश्यकता आहे.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

मोह काही क्षणांचा...

➖➖ *विचारधन - ३* ➖➖

'काही क्षणांचा' मोह टाळला तर 'बराच कालावधी' सुखद होतो.

😊 सागरराजे निंबाळकर

डोक्यावर सावली...

➖➖ *विचारधन - १* ➖➖

डोक्यावर 'सावली' असणं केव्हाही चांगलं. पण त्याच सावलीचा 'आडोसा' करून घेतला की एकाजागी थांबावं लागतं.

😊 सागरराजे निंबाळकर

Saturday, November 14, 2020

येऊदे दिवाळी

----- येऊदे दिवाळी -----

लावूनिया आज । लक्ष दीप द्वारी 
करू सृष्टी सारी । तेजोमयी ।।१।।

लक्ष्मीची पाऊले । लागती ज्या घरा 
'वास' तेथे खरा । समृद्धीचा ।।२।। 

धनत्रयोदशी । दिवाळी पाडवा 
हक्काने वाढवा । गणगोत ।।३।।

चिवडा, चकली । बेसनाचे लाडू 
ताटामध्ये वाढू । आग्रहाने ।।४।।

शंकरपाळीचा । वेगळाला ढंग 
वाढवितो रंग । फराळाचा ।।५।।

फराळासारखे । व्हावे एकरूप 
वाढतो हुरूप । सलोख्याने ।।६।।

भाऊबीजेसाठी । येतो भाऊराया
डोळ्यामध्ये माया । साठवून ।।७।।

सणानिमित्ताने । होती सारे गोळा 
पाणी येते डोळा । आनंदाने ।।८।।

राजा असो रंक । प्रत्येकाच्या भाळी 
येऊदे दिवाळी । उत्साहाने ।।९।।

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर 
मो - ८८७९८९७७९७

Friday, November 13, 2020

जिवंत रांगोळी

- जिवंत रांगोळी -

करता पहाटे
सडासंमार्जन
होते रांगोळीने
समृद्ध अंगण

पाहता एखादी
जिवंत रांगोळी
कमी पडतात
प्रशंसेला ओळी

समारंभ किंवा
सण कोणताही
रांगोळीशिवाय
शोभा येत नाही

कधी साच्यातली
कधी ठिपक्यांची
रांगोळीत नक्षी
चंद्र-तारकांची

हर्ष लाभावया
जीवनात खूप
रांगोळीसारखे
होऊ एकरूप

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Thursday, November 12, 2020

इंद्रधनुचे रंग

इंद्रधनुचे रंग 
आकाशी खुलून दिसती 
नेत्रांना सुखावती 

बिलगतो तनाला 
रानातला शीतल वारा 
घोंगडीचा सहारा 

भरलेल्या तळ्यात 
बदके बागडती सारी 
क्षण टिपू किनारी 

वसंत आगमन  
चोहीकडे मातीचा गंध 
पाऊसधारा मंद

@ सागरराजे निंबाळकर

Monday, November 9, 2020

प्रेमा तुझे रंग

-- प्रेमा तुझे रंग --

ओळखावे कसे
प्रेमा तुझे रंग
युगानुयुगे तू
आहेस अभंग

कधी 'तात' होतो
कधी होतो 'माय'
भाव-भावनांचा
अनोखा पर्याय

ऋणानुबंधाच्या
बांधुनिया गाठी
होतो वार्धक्यात
आधाराची काठी

प्रेमाला नेमकी
आकृती नसते
कधी मनी, कधी
डोळ्यात दिसते

जमेल त्यापरी
प्रेम घ्यावे-द्यावे
अमृताला अशा
घोट-घोट प्यावे

@ सागरराजे निंबाळकर

Saturday, November 7, 2020

उंदरांची शाळा

--- उंदरांची शाळा ---

एका अंधाऱ्या खोलीत
भरायची उंदरांची शाळा
चिचुंद्री शिक्षिका त्यांची
तास घेण्याचा भलताच कंटाळा

अंधार पडला की निघायचे
पाठीवर दप्तर घेऊन
कोणी म्हणायचा भूक लागली
बाई, मी येऊ का जेवून

पहिला तास गणिताचा
दुसऱ्याला मैदानी खेळ
खोड्या काढत एकमेकांच्या
हसत-खेळत जायचा वेळ

उड्या मारायच्या इकडून तिकडे
उंदरं सगळी, दंगेखोर होती
गुपचूप जाऊन कधी, कुठेही
कुरतडायची धान्याची पोती

पाठांतर करवून, सगळ्यांना
बाईंनी परीक्षेला बसवलं
एकमेकांची करून नक्कल
उंदरांनी, त्यांनाच फसवलं

निकालादिवशी उंदरांनी विचारलं
आहे का? खुशखबर काही
बाई म्हणाल्या, पळा इथून
तुमचं, काहीच होणार नाही

@ सागरराजे निंबाळकर

Tuesday, November 3, 2020

वाट ध्येयाची

-- वाट ध्येयाची --

सदाचाराचा
ध्यास लागला
जन्म अवघा
सार्थ जाहला

मुला-बाळांच्या
शिक्षणापायी
ध्यास उराशी
जपते आई

दिसू लागता
ध्येय सामोरी
पाटी यशाची
उरे न कोरी

अडचणीत
होण्या विजेते
वाट ध्येयाची
समीप नेते

लागते जेव्हा
ध्येयाचे वेड
रचली जाते
मुहूर्तमेढ

@ सागरराजे निंबाळकर

Monday, November 2, 2020

आधार द्यावा

-- आधार द्यावा --

संकटी त्याला
आधार द्यावा
मनोभावे जो
करतो धावा

पैसा-अडका
गौण असतो
आधार जेथे
नित्य वसतो

काय सांगावी
जादू शब्दांची
नाळ जुळते
मनामनांची

आधार आहे
अशी फुंकर
ज्याने जीवन
होते सुकर

एकमेकांना
कवेत घेऊ
जमेल तसा
आधार देऊ

@ सागरराजे निंबाळकर

Friday, October 30, 2020

शीत काया

-- शीत काया --

शीत होते
सारी काया
सांज देते
ऐसी छाया

सूर्य जाता
ढगांमागे
घरट्याची 
ओढ लागे

सांजवेळी
गार वारा
आठवांना
देतो थारा

सांज जेव्हा
दूर नेते
चांदण्यांची
शीळ येते

जीव सारे
तारणारी
सांज येवो
नित्य दारी

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Thursday, October 29, 2020

मोहमाया

-- मोहमाया --

जपू नये
मोहमाया
उभा जन्म
जातो वाया

सन्मार्गाचे
बारकावे
वेळोवेळी
ओळखावे

हाती फक्त
दुःख देतो
खूप काही
मोह नेतो

संपवितो
ज्याला-त्याला
मोह ऐसा
एक प्याला

जसे आले
तसे जाती
मोहामुळे
होते माती

@ सागरराजे निंबाळकर

Wednesday, October 28, 2020

सांग मना

-- सांग मना --

मनावर
येता ताण
कधी-कधी
जातो प्राण

कुशंकांना
नको थारा
होतो मनी
कोंडमारा

ओठांवर
शब्द नाही
पण, मनी
खूप काही

बिघडता
मनःस्थिती
सांगू त्रास
कोणा, किती?

घ्यावा आम्ही
कसा ठाव
सांग मना
तुझे गाव

@ सागरराजे निंबाळकर

Tuesday, October 27, 2020

सत्यवाणी

-- सत्यवाणी --

सदोदित
सत्य बोलू
हृदयाचे
द्वार खोलू

सत्यामुळे
होतो जय
सत्कर्मात
नाही भय

गोड वाटे
सत्यवाणी
अभंगांची
होती गाणी

गुंफू नित्य
सत्य माला
सौख्य देऊ
काळजाला

भिनवावे
सत्य अंगी
होतो जन्म
बहुरंगी

@ सागरराजे निंबाळकर

Saturday, October 24, 2020

नाळ मनाची

--- नाळ मनाची ---

ध्यानीमनी नसताना
साथ आजन्म मागते
नाळ जुळण्या मनाची
काय वेगळे लागते

माझे-माझे करताना
होते शेवटाला माती
पैसा सोबती क्षणांचा
कामी येती, फक्त नाती

नात्यातल्या विश्वासाचा
जर झाला उपहास
आयुष्यात पदोपदी
होतो, जीवघेणा त्रास

यंदा देऊ दसऱ्याला 
एकमेका आलिंगन
एका छोट्याशा कृतीने
नक्की सुखावेल मन

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Friday, October 23, 2020

मान कुलदेवतेचा

------- मान कुलदेवतेचा -------

नवरात्रीमध्ये । शक्ती उपासना
होतात कामना । पूर्ण साऱ्या ।।१।।

महिषासुराचा । वध करावया
आली दैवी छाया । जगदंबा ।।२।।

त्रिशूळ, धनुष्य । शंख, तलवार
सिंहावरी स्वार। दुर्गा माता ।।३।।

कधी सौम्य कधी । रूप भयानक
दुर्जना घातक । महाकाली ।।४।।

पालन जगाचे। आहे तिच्या हाती
सृष्टीची निर्माती । आदिशक्ती ।।५।।

कल्याणदायिनी । त्रिमूर्ती चेहरा
मांगल्याचा झरा । नारायणी ।।६।।

करवीरी आहे । शक्तीपीठ खास
करते निवास । महालक्ष्मी ।।७।।

अठरा भुजांची । सप्तश्रृंगी माता
टेकविती माथा । भक्तगण ।।८।।

तुळजाभवानी । स्रोत प्रेरणेचा
कुलदेवतेचा । मान तिला ।।९।।

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Thursday, October 22, 2020

योग असावा लागतो

-- योग असावा लागतो --

हात जोडले कैकदा
लाख केल्या गयावया
तेव्हा कुठे दारी माझ्या
सुख आले भेटावया

हक्क प्रत्येक गोष्टीचा
तसा कुणीही मागतो
पण, हवं ते मिळाया
योग असावा लागतो

जन्म जातो मोजताना
भवसागराची खोली
तरी आयुष्या, लावती
सारे तुझ्यावर बोली

➡️ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Sunday, October 18, 2020

आई तुझे नाम

----------- आई तुझे नाम -----------

दिनरात मुखी माझ्या, आई तुझे नाम
आई तुझ्या चरणात, वसे चारिधाम ।।धृ।।

जन्म झाला पोटी तुझ्या, संचित असावे
आता वेगळे आणिक, काय मी मागावे

भाग्यशाली झाला जसा, कौसल्येचा राम ।।१।।

स्वतः राहिली उपाशी, मज गोडधोड
दिले हवे ते ते सारे, नाही हिरमोड

तुझ्या कुशीत व्यथांना, मिळतो विराम ।।२।।

शिदोरीच्या रूपे दिली, संस्कारांची खाण
तुझ्यामुळे आहे मज, समाजात मान

आशीर्वच राहो डोई, करतो प्रणाम ।।३।।

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Thursday, October 15, 2020

कोवळी किरणे

------- कोवळी किरणे -------

पहाटे-पहाटे । सूर्यनारायण
करी पारायण । प्रकाशाचे ।।१।।

कोवळी किरणे । येता दारावर
उजळते घर । चैतन्याने ।।२।।

अर्घ्य वाहण्याचे । होती सोपस्कार
सूर्यनमस्कार । घालू नित्य ।।३।।

हर्षाने डोलती । वेली, पाने-फुले
आसमंत खुले । होता तया ।।४।।

सारून अंधार । येऊ प्रकाशात
करू सुरुवात । तेजोमयी ।।५।।

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

सेवा साहित्याची

------- सेवा साहित्याची -------

शास्त्रशुद्ध लिहू । शिकू व्याकरण
करूया जतन । मातृभाषा ।।१।।

नको मोडतोड । जुन्या प्रकारांची
खोली साहित्याची । मोज जरा ।।२।।

मना येई तसे । लिहिती सुमार
जडला विकार । प्रसिद्धीचा ।।३।।

ज्ञान संवर्धन । नाव सदरास
त्यात उपहास । लेखणीचा ।।४।।

कंपूशाहीमध्ये । जोडतात मित्र
मनाजोगे चित्र । रेखाटाया ।।५।।

करू संयमाने । मनन-चिंतन
स्वयंपरीक्षण । होते त्याने ।।६।।

जे जे सांगायचे । सांगा रचनेत
मांडू नये हेत । वेगळाला ।।७।।

मनोभावे करू। सेवा साहित्याची
मार्गदर्शकांची । कमी नाही ।।८।।

राजा असो रंक । व्हावया विकास
हवा प्रत्येकास । गुरू एक ।।९।।

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Tuesday, October 13, 2020

अक्षरांचा मेळ

------- अक्षरांचा मेळ -------

साधावा लागतो । अक्षरांचा मेळ
सोपा नव्हे खेळ । छंदोबद्ध ।।१।।

उच्च यमकांचे । शब्द योजल्यास
उंची आशयास। आपसूक ।।२।।

करून आरंभ । लिहा चाराक्षरी
लिहा षडाक्षरी । सरावाला ।।३।।

सम अक्षरात । सांगड शब्दांची
आठ अक्षरांची । अष्टाक्षरी ।।४।।

हवी प्रमाणात । गेयतेची गती
सांभाळावी यती । गीतामध्ये ।।५।।

गजलेचा मोह । होतो अनेकांना
गुंफण्या शब्दांना । वृत्तामध्ये ।।६।।

पोवाडे गाताना । उंची आवाजाची
वाटावी वाघाची । डरकाळी ।।७।।

कठोर शब्दांचा । मार्मिक फटका
लावतो चटका । काळजाला ।।८।।

'ट' ला 'ट' प्रपंच । वाटे जरी साधा
आशयाला बाधा । येते त्याने ।।९।।

असतो पुष्कळ । हातात अवधी
शोधा योग्य संधी । संयमाने ।।१०।।

लाभो सकलांना । साथ शारदेची
शब्दसंपदेची । कृपा नित्य ।।११।।

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Saturday, October 10, 2020

चारोळी

होईलही शरीरावर मलमपट्टी
मनाच्या जखमांचं काय करावं

म्हणूनच टाळतो गुंता भावनांचा
दुःख उराशी कुठवर धरावं

➡️ सागरराजे निंबाळकर

Sunday, September 27, 2020

चारोळी

मनावरच्या जखमा भरायला
वेळ तसा, बराच लागतो

का तरी मग मी नेहमी
मन सांगेल तसंच वागतो

😇 सागरराजे निंबाळकर

Friday, September 25, 2020

त्यागा अहंकार

------- त्यागा अहंकार -------

ज्याचा अहंकारी । असतो स्वभाव
काळजाला घाव । होतो त्याच्या ।।१।।

जर अहंकार । पाळला जीवनी
दुष्टचक्र मनी । चाले सदा ।।२।।

अहंकारामुळे । तुटतात नाती
दुखावले जाती । मित्रगण ।।३।।

देऊ तिलांजली । साऱ्या दुर्गुणांना
योग्य विचारांना । स्वीकारून ।।४।।

जीवनाचा मार्ग । निवडावा साधा
कुकर्मांची बाधा । नको त्यात ।।५।।

त्यागा अहंकार । होईल कल्याण
कर्माला प्रमाण । मानू सदा ।।६।।

सार जीवनाचा । वर्णितो सागर
सुखाचे आगर । करावया ।।७।।

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Monday, September 21, 2020

राहते काय हाती

------ राहते काय हाती ------

सानी मिसरा प्रा. सतीश देवपूरकर यांच्या एका गजलेतला

जागण्यातच खर्च झाल्या कैक राती
(आठवांवर लोटता आली न माती)

बारगळते योजना जेव्हा सुखांची
दुःख सारे पास होते एकहाती

विसर सारे तू जुने अन सोड कटुता
गोडव्याने जोडता येतात नाती

एकट्याने जळत नाही हा निरंजन
साथ त्याला नित्य देती सांजवाती

प्रेम करताना कधीही ठेव ध्यानी
नेहमी येतील तुजला आड जाती

एकदा का प्राण येथे सोडल्यावर
राहते सांगा तसेही काय हाती

@ सागरराजे निंबाळकर
मो - ८८७९८९७७९७

Saturday, September 19, 2020

दुर्मीळ झाले भेटणे

----- दुर्मीळ झाले भेटणे -----

शक्य नाही रोज आता एकमेका पाहणे 
(दिवस कसले आजचे दुर्मीळ झाले भेटणे)

गर्व होता माणसाला मी शहाणा एकटा 
भोवले बघ आज त्याला व्यर्थ सारे वागणे 

संकटाला मित्र माझा मानतो मी, त्यामुळे 
काय सांगू दुःख माझे काय देऊ कारणे 

मोद सारा गोठला अन शुष्क झाल्या भावना 
का तरीही जिंदगीला देत जातो दूषणे 

जागलो मी कैक रात्री विरह साहूनी सये 
सोड आता तू अबोला हेच माझे मागणे 

एकट्याने यायचे अन एकट्याने जायचे 
भाग आहे येथ साऱ्या सत्य हे स्वीकारणे

@ सागरराजे निंबाळकर
मो - ८८७९८९७७९७

Monday, September 14, 2020

बापाची कहाणी

-- बापाची कहाणी --

खिसा भरलेला असो
किंवा राहोत रिकामा
बाप देतो लेकरांना
सदा मायेचा मुलामा

राबूनिया दिसरात
येती तळहाती फोडे
लेकरांच्या सुखापायी
त्याने झिजवले जोडे

भाऊ, पती आणि बाप
निभावतो सारी नाती
भार संपूर्ण घराचा
तोलूनिया एकहाती

लेकरांच्या ताटामध्ये
कमी पडताच काही
त्याच्या घशातून घास
खाली उतरत नाही

भेट देतो लेकरांना
नव्याकोऱ्या कापडांची
स्वतः वापरतो जुने
जोड देतो ठिगळांची

आहेराच्या स्वरूपात
देतो आयुष्याची पुंजी
सुख लेकीचे घालते 
त्याच्या मनामध्ये रुंजी

वर फणसासारखा
आत नारळाचं पाणी
खरं सांगायचं तर
हीच बापाची कहाणी

➡️ सागरराजे निंबाळकर
मो - ८८७९८९७७९७

Sunday, September 13, 2020

नको मोहमाया

------- नको मोहमाया -------

रुसवा फुगवा । सुरूच असतो
निवांत बसतो । कधी कोणी? ।।१।।

भौतिक सुखात । वेळ जातो वाया
नको मोहमाया । कशाचीही ।।२।।

जपतो जेवढे । नश्वर देहाला
तेवढे मनाला । अभ्यासावे ।।३।।

चांगले-वाईट । समज मनाचा
मोजक्या क्षणांचा । खेळ सारा ।।४।।

घेऊ नका जास्त । ताण मनावर
लिहा पानावर । रोज थोडे ।।५।।

ठेवले जर का । सुखांना तारण
वाटे निष्कारण । सारे काही ।।६।।

येते सागराला । ओहोटी-भरती
चालावे पुढती । तैसे नित्य ।।७।।

@ सागरराजे निंबाळकर
मो - ८८७९८९७७९७

Saturday, September 12, 2020

सुखात नांदो बळीराजा

--- सुखात नांदो बळीराजा ---

येते आणिक जाते
पावसाची संततधार
जीवा घोर अपार

राब-राबतो शेतात
भाव नाही कधी धान्याला
फोडे तळहाताला

रक्तवर्ण उन्हात
कष्टातून उसंत थोडी
सर्जा-राजाची जोडी

अनंत मजवरी
काळ्या आईचे उपकार
जगण्याचा आधार

मिळूदे दाणा-पाणी
सुखात नांदो बळीराजा
हाच भारत माझा

➡️ सागरराजे निंबाळकर
मो - ८८७९८९७७९७

Thursday, September 10, 2020

चॉकलेटचा खाऊ


-- चॉकलेटचा खाऊ --

खेळता खेळता अचानक
रुसून बसली मनीमाऊ
दूध भात नको म्हणाली
हवाय चॉकलेटचा खाऊ

मोतीदादांनी पाठीवर बसवलं
फिरवून आणली सारी बाग
तरी माऊ सोडेना हट्ट 
जाईना तिच्या मिशीवरला राग

हत्ती, अस्वल, माकड आले
ती कुणाशीच बोलली नाही
बोकोबा झाले चिंताग्रस्त
कुणालाच सुचेना आता काही

शेवटचा पर्याय म्हणून तिला
सिंहाच्या दरबारी नेलं
सिंहाने विचारलं का गं माऊ
तू जेवण का नाही केलं

सिंहाने बोलावलं उंदराला
दाखवले त्याचे किडलेले दात
पाहून ते, घाबरली माऊ
म्हणाली, मी खाईन दूध भात

माऊने सोडला हट्ट चॉकलेटचा
दूध भात चाटून-पुसून खाते
तिलाही कळत नाही आता
ती कधी गाढ झोपी जाते

🤗 सागरराजे निंबाळकर
मो - ८८७९८९७७९७

Sunday, September 6, 2020

हेत जीवनाचा

-- हेत जीवनाचा --

आलो कशाला भूवरी
काय हेत जीवनाचा
चित्त एकाग्र करून
कर यत्न शोधण्याचा

आई-बाप, ताई-भाऊ
काही क्षणांचे सोबती
आवरून भावनेला
सदा चालावे पुढती

एक ना एक दिवस
देह सोडून जायचा
उलगडा या सत्याचा
तुला कधीरे व्हायचा

तपश्चर्येतून येथे
योग्य तेचि पारखावे
भाग्यवंता उमगती
जीवनाचे बारकावे

➡️ सागरराजे निंबाळकर
मो - ८८७९८९७७९७

Saturday, September 5, 2020

लेखणी देखणी

-- लेखणी देखणी --

कार्य शब्दांचे
बळ देण्याचे
लेखणी शस्त्र
साहित्यिकांचे

कवेत घेते
दिलासा देते
लेखणी जेव्हा
सांत्वना येते

लावते लळा
प्रसवी कळा
लेखणीमुळे
दाटतो गळा

छंद फुलवा
शब्द जुळवा
लिहावे, पण
आशय हवा

माझी लेखणी
दिसे देखणी
शब्दा-शब्दांची
होता पेरणी

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Friday, September 4, 2020

हायकू

सूर्याच्या किरणांनी
थेंब दवाचा मोती झाला
थोड्याश्याच क्षणाला

हिरव्या शिवारात
पक्षी-प्राणी बागडती
कळ्या-फुले फुलती

निळ्या-निळ्या ढगात
पहा आले इंद्रधनुष्य
सुखावला मनुष्य

गर्द हिरवाईत
आनंदून जातसे मन
टिपले सारे क्षण

➡️ सागरराजे निंबाळकर
मो - ८८७९८९७७९७

Thursday, September 3, 2020

चारोळी

सांगायचं होतं तिला काहीतरी
पण, न सांगताच निघून गेली

किस्सा जरी हा भूतकाळातला
आठवतो आजही, वेळी-अवेळी

😇 सागरराजे निंबाळकर

Wednesday, September 2, 2020

चारोळी

मनमोकळं बोलली नाही आज
निरोपही तिने घाईतच घेतला

काहीतरी सांगू पाहत होता..
भाव तिच्या बोलक्या डोळ्यातला

➡️ सागरराजे निंबाळकर

Tuesday, September 1, 2020

चारोळी

तारुण्याच्या प्रवाहात वाहताना
मज पडला, वार्धक्याचा विसर

इच्छा, आकांक्षेच्या धुक्यात मग
ध्येय दिसू लागले, धुसर-धुसर....

😇 सागरराजे निंबाळकर

Sunday, August 30, 2020

उरला कुणी न वाली

------- उरला कुणी न वाली -------

माझ्याच आसवांना उरला कुणी न वाली
कळवू कशी मुक्याने ओठातली खुशाली

वृद्धाश्रमात आई रुग्णालयात बाबा
आहेत चार मुलगे पण काय वेळ आली

सांगायचे म्हणाली काहीतरी सखी पण
अस्वस्थ चेहऱ्याने आली तशी निघाली

दुर्लक्ष रोज करते लाखो चुका मुलांच्या
आईपरी जगी या कोणी कधी न झाली

रंगात रंगलेले झेंडे तऱ्हेतऱ्हेचे
नाचू कुणाकुणाच्या घेऊन मी मशाली

जमले कधी तुला जर भेटावयास ये तू
विरहातला अबोला काढू सये निकाली

नाते युगायुगांचे होते तरी सये का
सोडून साथ माझी गेलीस तू अकाली

जमिनीलगतच आहे शेरातला कवाफी
गझलेस येथ माझ्या उंची जरी मिळाली

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

चारोळी

तू न बोलताच निघून गेल्यावर
वाटलं खूपकाही एका क्षणाला

तेव्हापासून, अर्थ विरहाचा सये 
मी समजावतो भाबड्या मनाला

😇 सागरराजे निंबाळकर

चारोळी

लीन होताना आईच्या चरणी
यायची मुखी, वेगळीच झळाळी

आठवून सारं, पाणावतात डोळे
होतो, मीही श्रीमंत कधीकाळी

➡️ सागरराजे निंबाळकर

Saturday, August 29, 2020

चारोळी

एकीकडे टाळायचं, दुसरीकडे पाहायचं
तासनतास, खिडकीत उभं राहून

तुझ्या नि माझ्या अलिखित प्रेमाचा
काय असेल वेगळा पुरावा याहून

😇 सागरराजे निंबाळकर

Thursday, August 20, 2020

काय सांगायचे

----- काय सांगायचे -----

एकदा यायचे एकदा जायचे
काय मग एवढे रोज मागायचे

त्रास होऊ नये येथ अपुला कुणा
पथ्य हे जीवनी नित्य पाळायचे

ठरवतो रोज सारेच सांगेन अन्
विसरतो नेमके तेच बोलायचे

सांग शिकली कुठे कसब तू हे प्रिये
भाव डोळ्यातले सहज वाचायचे

का लपंडाव खेळून माझ्यासवे
आखते रोज तू बेत टाळायचे

तूच ओळख सये भाव डोळ्यातले
वेगळे मी तरी काय सांगायचे

@ सागरराजे निंबाळकर

Tuesday, August 18, 2020

मज भार होत नाही

------- मज भार होत नाही -------

भेगाळल्या भुईचा मज भार होत नाही
शेती उजाडते पण मी ठार होत नाही

साधाच भांग होता अन पावडर जराशी
आई तसा अता मी तैयार होत नाही

निष्पाप लेकरांना हे दोन घास द्याया
थकतोय फक्त बाबा बेजार होत नाही

घालून गळ तिला मी अडवू अता कशाला
नात्यात भावनांचा व्यापार होत नाही

संवाद संपलेला अन बंद ही कवाडे
एका गुणामुळे या शेजार होत नाही

तजवीज या सुखांशी करणे अमान्य मजला
मी हार मानतो पण लाचार होत नाही

आधुनिकता जगाची, बघ दूर लोटणारी
चिठ्ठी हयात नसते अन तार होत नाही

@ सागरराजे निंबाळकर

चारोळी

आशा-आकांक्षांच्या हिंदोळ्यांवर
मन घेत राहते हेलकावे

काय असतं आयुष्य नेमकं?
कसे हेरायचे त्यातले बारकावे

😇 सागरराजे निंबाळकर

चारोळी

दूर उभे राहिल्यास, येतो सुगंध
जवळ गेल्यास, बोचतात काटे

याच कारणामुळे असतो संभ्रमात
जाऊ की नको, या फुलांच्या वाटे

😇 सागरराजे निंबाळकर

Friday, August 14, 2020

चारोळी

लागलाच कधी, चटका मला..
झळ त्याची, तिलाही लागायची

आत्ता उमगलं, लेप लावून मला
का आई, रात्रभर जागायची

@ *सागरराजे निंबाळकर*

Monday, August 10, 2020

चारोळी

ओठांना ओठांचा स्पर्श अलगद
वाणीही, अगदी मूक व्हावी.....

सांग सये, वाटत नाही का तुला
आपल्याही हातून, एखादी चूक व्हावी

😉 *सागरराजे निंबाळकर*

Sunday, August 9, 2020

चारोळी

दिशाहीन नका होऊ धावून
खटाटोप सारा, ठरेल व्यर्थ

सोडून जायचे सर्वच येथे..
एवढाच काय तो आयुष्याचा अर्थ

@ *सागरराजे निंबाळकर*

Saturday, August 8, 2020

चारोळी

भुकेने व्याकुळ असताना
आई भरवते जेव्हा घास

चव त्या चटणी भाकरीची
जिभेवर रेंगाळते तासनतास

🤗 सागरराजे निंबाळकर

Friday, August 7, 2020

चारोळी

कुणाची धरावी संगत येथे
मजला नेहमी पडतं कोडं

म्हणूनच राहतो अलिप्त आता
सारून त्रासाला थोडं-थोडं

😇 सागरराजे निंबाळकर

चारोळी

दुःख न मागताच मिळतं
सुख भुर्रकन उडून जातं

तरीही मला लळा जीवनाचा
असेल त्याच्यासवे पूर्वीचं नातं

😇 सागरराजे निंबाळकर

Thursday, August 6, 2020

माता पिता सेवा

💫     *माता पिता सेवा*     💫

*पुंडलिका तुझा । वाटे मज हेवा*
*माता पिता सेवा । मनोभावे ।।१।।*

*सारी तीर्थक्षेत्रे । मातृचरणात*
*पिता सदनात । हृदयाच्या ।।२।।*

*गायली अंगाई । शांत निजवाया*
*जीवापाड माया । माझ्यावरी ।।३।।*

*ठेचाळता पाय । अश्रू घळाघळा*
*आर्त कळवळा । काळजीने ।।४।।*

*घेतलेत कष्ट । उपाशी राहूनी*
*अपेष्टा साहूनी । प्रेमापोटी  ।।५।।*

*माता पिता माझे । विठू रखुमाई*
*शिवाची जिजाई । होती जैसी  ।।६।।*

*फेडावया ऋण । जन्मही अपुरा*
*शब्दांचा हा तुरा । त्यांच्यासाठी ।।७।।*

*यशासाठी माझ्या । झटती सदैव*
*लढावया चेव । संकटांशी ।।८।।*

*देवा पांडुरंगा । सुखी त्यांना ठेवा*
*घडो नित्य सेवा । हातुनिया ।।९।।*

*कशाला फिरू मी । आता चारीधाम*
*मायपिता नाम । जिव्हेवर ।।१०।।*

*झालो आज लीन । त्यांच्या चरणाशी*
*सुखाचिया राशी । सदोदित ।।११।।*

💫 *सागरराजे निंबाळकर* 💫
          उल्हासनगर, ठाणे
           ८८७९८९७७९७

Wednesday, August 5, 2020

चारोळी

सरीत नाहताना सुखांच्या
मज, वास्तवाचा विसर पडला

इथेच झाली चुकामूक संयमाशी
अन, आक्रोशाचा विकार जडला

😇 सागरराजे निंबाळकर

Tuesday, August 4, 2020

चारोळी

राहून राहून आठवते मजला
माझ्या, गावाकडली माती

सारे दुरावले मजपासून...
ती अजूनही, माझी सांगाती

🤗 सागरराजे निंबाळकर

Monday, August 3, 2020

लाखात एक ताई माझी

-- लाखात एक, माझी ताई --

भावा-बहिणीच्या । पवित्र नात्याचा
रक्षाबंधनाचा । सण आज ।।१।।

लाखामध्ये एक । आहे माझी ताई
मानतो मी आई । तिला दुजी ।।२।।

माया तिची मज । मिळते अपार
हक्काचा आधार । संकटात ।।३।।

क्षणात रुसवा । हसते क्षणात
आहे काळजात । जागा तिची ।।४।।

मुक्ताई-ज्ञानेशा । आमुचा आदर्श
जीवनात हर्ष । त्यांच्यामुळे ।।५।।

निरांजनातील । उजळत्या ज्योती
जणू काही मोती । तेजोमयी ।।६।।

वाजता मंडपी । सनई-चौघडा
ओलावती कडा । निरोपाने ।।७।।

माहेर सोडून । गाठते सासर
सुने-सुने घर । तिच्याविना ।।८।।

मनगटावर । राखी बांधायाला
हवी प्रत्येकाला । ताई एक ।।९।।

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Saturday, August 1, 2020

चारोळी

शांत राहिल्याने कधीकधी
सुटतात, माझी बरीच कोडी

आपलंसं वाटतं सुख मग
येते जगण्याला, नव्याने गोडी

😇 सागरराजे निंबाळकर

Friday, July 31, 2020

चारोळी

संकटांच्या वावटळीतून
सोडवावे स्वतःला प्रयत्नांनी

नको विचार पुन्हा-पुन्हा
किती, कसे छळले यातनांनी

😇 सागरराजे निंबाळकर

Monday, July 27, 2020

आयुष्याचे रूप आगळे

-- आयुष्याचे रूप आगळे --

आयुष्याचे रूप आगळे
आकळेना येथ कुणाही
सोडवावे कोडे कसे हे
पेच पडलाय मलाही

कधी हास्य खळखळून
कधी या आसवांच्या धारा
तरीही पीक वेदनांचे
पेरतोय येथ दुबारा

झाले-गेले विसरू आणि
चालू पुढेपुढे जरासे
तेवढ्यात टाकतो काळ
पुन्हा नवनवीन फासे

थकल्या-भागल्या जीवाने
आता, करावे तरी काय
ऐकेन यंदाही विधात्या
तूच सांग तरणोपाय

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Saturday, July 25, 2020

चारोळी

सुखाचा शोध घेण्यासाठी
सहज वळून पाहिले मागे

मोहमायेच्या नादी लागून
दिसले, विस्कटलेले धागे

😇 सागरराजे निंबाळकर

Friday, July 24, 2020

कसे विस्मरावे

------- कसे विस्मरावे -------

(तुला वाटते का? मला आठवावे)
जरा वेळ काढून भेटून जावे

असो वा नसो जवळ माझ्या सये तू 
तुझे रुप मनी मी सदा साठवावे

कधी कौल देणार मजला प्रिये तू
किती घेत राहू असे हेलकावे

नमस्कार करतो कुणाला कशाला
तुझे तूच नोंदवुन घे बारकावे

तुझ्या हातची चव ग न्यारीच आई
तुझे वाढणे मी कसे विस्मरावे

😊 सागरराजे निंबाळकर

Thursday, July 23, 2020

चारोळी

अबोला सोडून कायमचा
जोडला संवादाचा धागा

सहज व्यापली गेली मग
एकमेकांच्या काळजातली जागा

😇 सागरराजे निंबाळकर

Tuesday, July 21, 2020

चारोळी

सांभाळून चालावं जेवढं
तेवढा अधिक तोल जातो

म्हणूनच की काय गर्दीत
मी एकटाच मागे राहातो

😇 सागरराजे निंबाळकर

Friday, July 17, 2020

चारोळी

मनात खूप काही होतं
जे, ओठांवर आलं नाही

तसंही कुठे जमलं तुला
मला समजून घ्यायलाही

😇 सागरराजे निंबाळकर

चारोळी

मनात खूप काही होतं
जे, ओठांवर आलं नाही

तसंही कुठे जमलं तुला
मला समजून घ्यायलाही

😇 सागरराजे निंबाळकर

चारोळी

लाखो उपाय केले तरी
मूळ वेदनेचे, गवसले नाही

असह्य झाल्या यातना अन
डोळे माझे, झाले प्रवाही

😇 सागरराजे निंबाळकर

Thursday, July 16, 2020

बाप

----- बापासम कोणी नाही -----

कोणी 'बाप' म्हणे । कोणी म्हणे 'तात'
स्थान जीवनात । सारखेच ।।१।।

भाऊ, पती, पिता । अशी कैक नाती 
सारी एकहाती । सांभाळतो ।।२।।

झाले कधी दुःख । जातो एकांतात 
न्हातो आसवांत । चिंब-चिंब ।।३।।

मुलगा-मुलगी । वाटती समान 
मायेला प्रमाण । नाही त्याच्या ।।४।।

बाप देतो जेव्हा । आम्हा आशीर्वाद 
सुखांचा निनाद । चोहीकडे ।।५।।

बापासम जगी । दुजा कोणी नाही 
वेगळाले काही । सांगू काय ।।६।।

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर 
मो - ८८७९८९७७९७

Monday, July 13, 2020

चारोळी

लावला गजर, पाहिली रोजनिशी
तरी आठवेना, पूर्वीचं काही

खंदा हकीमच हवा अशावेळी
चालत नाही, दाखवून कुणालाही

😇 सागरराजे निंबाळकर

मूहूर्त चोरट्यांचा

मूळ गीत :- 
रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा
गीतकार :- सुधीर मोघे
संगीतकार :- पंडित हृदयनाथ मंगेशकर
गायक :- महेंद्र कपूर
चित्रपट :- हा खेळ सावल्यांचा

वृत्तबद्ध गीत, वृत्त - आनंदकंद

विडंबन खालीलप्रमाणे :-

------- मूहूर्त चोरट्यांचा -------

रात्रीस खेळ चाले या धूर्त चोरट्यांचा
चुकणार ना कधीही मूहूर्त चोरट्यांचा ।।धृ।।

हा चोरटा शहाणा गुपचूप चोरतो हा
मी शांत झोपल्याचा मौकाच पाहतो हा
काळोख होय साक्षी उत्स्फूर्त चोरट्यांचा ।।१।।

जो साव वाटतो तो असतो खरा लुटारू
चोरून धावल्यावर कोणास मी पुकारू
हसतोय आज मजला हा मूर्त चोरट्यांचा ।।२।।

या नेमक्या क्षणाला का वीज रोज जाते
डोक्यात हीच शंका माझ्या सदा रहाते
थांबून शोध घेतो मी तूर्त चोरट्यांचा ।।३।।

@ सागरराजे निंबाळकर

Sunday, July 12, 2020

चारोळी

खिळवून ठेवणं नजरेला
सयेला, चांगलंच जमायचं

म्हणून माझं चंचल मन
फक्त तिच्यातच रमायचं

💝 सागरराजे निंबाळकर

चारोळी

नाव ऐकलं तिचं की, आजही
तरळतात डोळ्यापुढे आठवणी

ओठ निशब्द होतात अचानक
एकमेकांना घट्ट बिलगते पापणी

➡️ सागरराजे निंबाळकर

Thursday, July 9, 2020

लाजली तू

------- लाजली तू -------

कितीदातरी भेटली, हासली तू
मला पाहता साजणी लाजली तू

असे बोलणे मोकळे रोज माझे
उगा कावरी-बावरी जाहली तू

सये घेतला हात हाती तुझा मी
सुखाने अता सोबती चालली तू

सखे काळ राती मधू सोबतीला
इथे चांदवा मी, नभी गाजली तू

किती पेटवावे निखारे गुलाबी
तरी प्रेमपोळी जरा भाजली तू

@ सागरराजे निंबाळकर

Wednesday, July 8, 2020

चारोळी

आजन्म एकटा राहिलो परी
आज जमला पहा गोतावळा

बहुदा कोणीतरी मृत्यूचा माझ्या
केला असावा दैदिप्यमान सोहळा

😇 सागरराजे निंबाळकर

चारोळी

आजन्म एकटा राहिलो परी
आज जमला पहा गोतावळा

बहुदा कोणीतरी मृत्यूचा माझ्या
केला दैदिप्यमान सोहळा

😇 सागरराजे निंबाळकर

येणार सुकाळ

-- येणार सुकाळ --

आज अवचित
दाटले आभाळ
बहुदा सरींचा
येणार सुकाळ

थेंब नभातून
येता धरेवर
होतो जलदांनी
सुखी चराचर

ओलेत्या मातीचा
चोहीकडे गंध
प्रस्थापित करी
सौख्याचे संबंध

बिलगून जाते
वाऱ्याची झुळूक
खाणाखुणा जशा
राहूनिया मूक

अधूनमधून
दाटावे आभाळ
सुखी राहावया
सारे सर्वकाळ

@ सागरराजे निंबाळकर

Monday, July 6, 2020

चारोळी

कुणाला सुखावतात आठवणी
कुणाला जातात अलगद छळून

अनुभव आला मलाही तेव्हा
जेव्हा, पाहिलं मी मागे वळून

😇 सागरराजे निंबाळकर

Sunday, July 5, 2020

गुरु करावा जीवनी

----- गुरु करावा जीवनी -----

एक तरी गुरु । करावा जीवनी
मिळे संजीवनी । चैतन्याची ।।१।।

गुरुविना नाही । शिक्षणा महत्व
जगण्याचे सत्व । त्यात सारे ।।२।।

बोट धरूनिया । पाय चालतात
माता आणि तात । आद्य गुरु ।।३।।

होते वाटचाल । योग्य मार्गावर
आनंदे, सुकर । गुरुंमुळे ।।४।।

गुरु असतात । ज्ञानाचा आगार
मानावे आभार । पदोपदी ।।५।।

अज्ञानास ज्ञान । देतसे अफाट
अंधारात वाट । दावी गुरु ।।६।।

गुरूंना नेहमी । द्यावा योग्य मान
ठेवोनिया जाण । संस्कारांची ।।७।।

आहे गुरुंमध्ये । त्रिमूर्तीचा वास
स्पर्श चरणास । करू त्यांच्या ।।८।।

राजा असो रंक । व्हावया विकास
हवा प्रत्येकास । गुरु एक ।।९।।

➡️ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Friday, July 3, 2020

चारोळी

जमिनीचं करून अंथरूण
नभाला पांघरूण करावं

आयुष्य जमेल तेवढं
असंच साधं-सोपं जगावं

➡️ सागरराजे निंबाळकर

चारोळी

लाखोंशी भेट होते रोज, मात्र
लक्षात राहतो एखादाच चेहरा

गुंत्यातून वाचण्यासाठी मग मी
सांभाळतो काळजाला जराजरा

➡️ सागरराजे निंबाळकर

Wednesday, July 1, 2020

ज्ञानाचे मंदिर

-- ज्ञानाचे मंदिर --

लाल कौलारू छप्पर 
हिरवळ भोवताली
पंचक्रोशीमध्ये ख्याती 
माझ्या शाळेला मिळाली ।।१।।

माझ्या बोबड्या शब्दांना 
छान लागले वळण 
अशा पवित्र शाळेला 
माझे शतदा नमन ।।२।।

जिथे शिकलो मांडाया 
आयुष्याचा ठोकताळा 
गुरु रूप आचार्यांचे
गुरुकुल माझी शाळा ।।३।।

लळा लावून मुलांना 
गुरु होती माय-बाप 
त्यांच्या कृपेच्या छायेत 
सुख मिळते अमाप ।।४।।

शाळा ज्ञानाचे मंदिर 
शाळा नव्हे फक्त वास्तू 
आशीर्वच देऊनिया 
गुरु म्हणती तथास्तु ।।५।।

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर 
मो - ८८७९८९७७९७

Monday, June 29, 2020

चारोळी

आई तुझ्या मायेच्या स्पर्शाने
सरतात माझ्या साऱ्या व्याधी

म्हणूनच नमवतो मी माथा
तव चरणात, ईश्वराआधी

🌺 सागरराजे निंबाळकर

चारोळी

तू जरी नसलीस आयुष्यात
तू असल्याचा भास होतो

बाकी सारं आलबेल आहे
एवढाच काय तो त्रास होतो

🌹 सागरराजे निंबाळकर

चारोळी

तू जरी नसलीस आयुष्यात
तू असल्याचा भास होतो

बाकी सारं आलबेल आहे
एवढाच काय तो त्रास होतो

🌹 सागरराजे निंबाळकर

Thursday, June 25, 2020

चारोळी

आयुष्यातील चढ-उतारांवर
मात करतो जो संयमाने

त्याचंच नाव घेतलं जातं
उदाहरणादाखल गौरवाने

🌺 सागरराजे निंबाळकर

Sunday, June 21, 2020

गूढ आरोग्याचे

☺     *गूढ आरोग्याचे*     ☺

*करा योगासने । सांगे योग गुरू*
*रोगमुक्त करू । शरीराला ।।१।।*

*पश्चिमोत्तासने । सुधारे यकृत*
*लाभ तो अद्भुत । होई तना ।।२।।*

*होताच वेदना । शरीराची सूज*
*करी हितगुज । शीर्षासन ।।३।।*

*बोलता तोतरे । कधी सिंहासन*
*कधी नौकासन । नित्यनेमे ।।४।।*

*गुण दोषांसह । होता रक्त कमी*
*वाढवाया हमी । प्राणायाम ।।५।।*

*मेघ निराशेचे । येता लठ्ठपणा*
*साद हलासना । मनोभावे ।।६।।*

*हात बळकट । होण्या घेई प्रण*
*हस्तभुजासन । भारदस्त ।।७।।*

*भुजंगासनाने । पचन हलके*
*हसरे बोलके । लाभदायी ।।८।।*

*जुलाब थांबवा । सर्वांगासनाने*
*प्रसन्न मनाने । पहाटेस ।।९।।*

*बध्दकोष्टतेचं । करू उच्चाटन*
*तेथे वज्रासन । साथ देई ।।१०।।*

*गूढ आरोग्याचे । वर्णीतो सागर*
*करावा जागर । चोहीकडे ।।११।।*

      *सागरराजे निंबाळकर*
          उल्हासनगर, ठाणे

Friday, June 19, 2020

संगीत

-- संगीत --

भुरळ घालते
संगीताची जादू
थाप डफावर
लागता निनादू

जेव्हा काळी-शुभ्र
संवादिनी गाते
सुरावट थेट
काळजात जाते

वाजता बासुरी
शहारते अंग
होती राधेसवे
गोपिकाही दंग

वीणेमुळे गुज
मनीचे कळती
छेडावया तारा
हात हे वळती

कीर्तनास येती
मुक्ताई, जनाई
टाळ घेत नाचे
विठू रखुमाई

डग्गा-तबल्याची
जमताच जोडी
संगीताने वाढे
आयुष्याची जोडी

@ सागरराजे निंबाळकर

चारोळी

जन्म दिला मज माऊलीने
सोसून गर्भातल्या अनंत कळा

त्यामुळेच कळली माया अन
लागला मज आईचा लळा

🌺 सागरराजे निंबाळकर

Thursday, June 18, 2020

चारोळी

तप्त उन्हाच्या झळांमध्ये
तुझा पदर, देतो छाया

हवीहवीशी वाटते आई
तुझी, न संपणारी माया

🌹 सागरराजे निंबाळकर

माणुसकी

-- माणुसकी --

जपावा साऱ्यांनी
माणुसकी धर्म
जीवनात सदा
करून सत्कर्म

भुकेल्यास अन्न
तहानल्या पाणी
जपा माणुसकी
सांगे संतवाणी

दीन दुबळ्यास 
मदतीचा हात
जपू सेवाभाव
नित्य काळजात

सांत्वनाचे शब्द
देतात आधार
राहू नये कधी
कोणी निराधार

टाळूनिया लोभ
योग्य तेच घ्यावे
यथायोग्य मार्गे
ज्याचे त्याला द्यावे

व्हावे कधीकधी
आंधळ्याची काठी
वाटे त्याला मग
आहे देव पाठी

जपू माणुसकी
मनोभावे आता
ठेवोनिया स्मित
मुखी येता जाता

@ सागरराजे निंबाळकर

Tuesday, June 16, 2020

निस्सीम प्रेमाला अटी-शर्ती नसतात

----- निस्सीम प्रेमाला अटी-शर्ती नसतात -----

     शर्वरी आणि सागर बालपणापासूनचे मित्र. दोघांच्या घरात फक्त दहा मिनिटांचं अंतर. शाळेत एकाच बाकावर बसणं, एकमेकांच्या डब्यातलं हक्कानं खाणं, सणावाराला एकमेकांच्या घरी जाणं इतकी सहजता नात्यात होती. दोघेही अभ्यासात हुशार. थोड्या फार फरकाने कधी शर्वरी पहिल्या क्रमांकावर तर कधी सागर. शाळेत 'दो हंसो का जोडा' नावाने प्रसिद्ध. दोघांच्या घरची परिस्थिती काहीशी बेताची त्यामुळे काटकसर, मेहनत हे गुण उपजत होते. 

     सहावीला असताना अपघातामुळे शर्वरीचे बाबा देवाघरी गेले आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरातली एकुलती एक कमावती व्यक्ती गमावल्याने आता पुढे काय? हा प्रश्न शर्वरीच्या आईला सतावत होता. शर्वरी आणि तिच्या पाठचे दोन भाऊ असल्याने शेवटी आईने काम करण्याचा निर्णय घेतला. दुसरा पर्यायही नव्हताच ! शर्वरीही दुःखात होती त्यामुळे शाळेत तिचा पूर्वीसारखा वावर नव्हता. सागरला तिच्या मनाची घालमेल कळत होती त्यामुळे जमेल तितका भावनिक, मानसिक आधार तो तिला देत होता. 

     प्राथमिक शाळा सातवीपर्यंतच असल्याने पुढील शिक्षणासाठी दोघांनाही वेगवेगळ्या शाळेत जावं लागलं. आपलं माणूस दुरावल्याची जाणीव मनाला सलत होती. शर्वरीला घरच्या जबाबदारीमुळे सहसा बाहेर जायला मिळत नसल्याने सागर अधूनमधून चौकशीसाठी तिच्या घरी जात असे. 
बालपणीच्या निरागस प्रेमाचं रूपांतर आता हळूहळू हव्याहव्याशा प्रेमात व्हायला लागलं होतं. तशी विचारणा दोघांपैकी कोणीही केली नव्हती पण नजरेच्या खेळातून मूकसंमती मात्र मिळाली होती. 

     असंच एकदा दिवाळीचं निमित्त गाठून सागर शर्वरीच्या घरी गेला मात्र दाराला कुलूप होतं. शेजारी चौकशी केली असता कळलं की आता ते तिथे राहत नाहीत. त्यांचं ते स्वतःचं घर नसल्याने त्यांना ती खोली सोडावी लागली. त्याकाळी दोघांकडेही दूरध्वनी नसल्याने आणि पत्रव्यवहार करावा तर कोणत्या पत्त्यावर? हा प्रश्न सागरला पडला. 

     दहावीनंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुन्हा नवीन महाविद्यालयात सागरने प्रवेश घेतला. एके दिवशी मित्रांबरोबर व्यायामशाळेत जाताना अचानक त्याला शर्वरी दिसली. 'तुम्ही व्हा पुढे' असं म्हणत सागरने शर्वरीला हाक मारली तशी ती थांबली. तब्बल दोन वर्षांनी भेट झाल्याने दोघे एकमेकांना पाहतच राहिले. काही काळाने भानावर येत शर्वरीने विचारलं "तू इथे कसा?" "मी इथे प्रवेश घेतला आहे" असं सागरने सांगितल्यावर तिला आनंद झाला. कारण आता दोघेही एकाच ठिकाणी शिक्षण घेत होते. 

     महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचं निमित्त गाठून आपल्या भावना शर्वरीला सांगायच्या असं सागरने ठरवलं. घरी जाताना तिचे दोन्ही हात हातात घेऊन सागरने एकदाची आपल्या भावनांना वाट करून दिली. "आता हे शक्य नाही सागर" असं म्हणत शर्वरी सागरच्या कुशीत शिरून आसवे गाळू लागली. 
"काय झालंय नेमकं शर्वरी?" सागरने तिचे डोळे पुसत विचारलं. शांत होत शर्वरीने सांगायला सुरुवात केली. 

     'बाबा गेल्यावर आई कसंबसं घर चालवत होती. पण जसजसं आम्ही मोठे होत गेलो आर्थिक ताण येत गेला. बाबांनी पूर्वी काहीजणांकडून छोटे-मोठे कर्ज घेतले होते ते परत करण्यासाठी देणगीदारांनी तगादा लावला. भाडं वेळेवर देता येत नसल्याने घरमालकाने खोली सोडण्याचा आग्रह धरला. काही काळ आम्ही माझ्या काकांकडेही राहिलो.' पण असं किती दिवस चालणार? काकांनीही घरगुती अडचणींचं कारण पुढे करत आता तुमचं तुम्ही बघा म्हणत घराबाहेर काढलं. 

     गेले सहा महिने आम्ही एका वडाच्या झाडाशेजारी झोपडी करून राहत होतो. आईच्या सहनशीलतेचा अंत झाल्याने तिने फाशी घेऊन आत्महत्या केली. 
दोन लहान भावांची जबाबदारी असल्याने नाईलाज म्हणून मी देहविक्रीचा व्यवसाय करू लागले. 'आयुष्यभर हेच नाही करायचं रे मला' म्हणून मी दिवसा शिक्षण घेत रात्री हा प्रपंच करते. एक-दोनदा तुझे मित्र पण तहान शमवून गेले. 'त्यांनी सांगितलं नाही का तुला?'
हे सगळं ऐकत असताना सागरचे डोळे अखंड वाहत होते. त्याने काहीही न बोलता तिचा हात धरला आणि तिच्या दोन्ही भावंडांसवे तिला थेट स्वतःच्या घरी नेलं. 

     घरी येताच सागरने आई-बाबांना सांगितलं, 'मला हिच्याशी लग्न करायचं आहे. जर ही नाही तर दुसरी कुणीच नाही.' सागरचे आई-बाबा शर्वरीला ओळखत होते. अचानक सागरने असा निर्णय का घेतला हे त्यांना कळत नव्हतं. रात्रीचं भोजन आटोपल्यावर सागर आणि शर्वरीला समोर बसवून सर्व हकीकत त्यांनी जाणून घेतली. काय प्रतिक्रिया द्यावी हे दोघांनाही सुचत नव्हतं. 'काढू आपण काहीतरी मार्ग' असं म्हणत त्यांनी सगळ्यांना खोलीत झोपायला जाण्याची सूचना केली. सकाळी दोघांनीही आपला निर्णय कळवला. 'लग्न अवश्य लावू पण इतक्यात नाही. अगोदर दोघे शिक्षण पूर्ण करा. आपापल्या पायावर उभे राहा. तोवर शर्वरी आणि तिचे दोन्ही भाऊ आपल्याकडेच राहतील.'

     निर्णय ऐकून दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. दोघांनीही उत्तम गुणांनी शिक्षण पूर्ण केलं. दोघांनाही भरघोस पगाराची नोकरी मिळाली. 
ठरल्याप्रमाणे दोघांचं विधिवत लग्न झालं. शर्वरीची दोन्ही भावंडं उच्च शिक्षण घेत आहेत. सगळं आलबेल सुरु आहे. 

     बऱ्याच दिवसांनी न राहावल्याने रात्रीचं भोजन आटोपल्यावर शर्वरीने सागरला विचारलं, 'माझी अशी परिस्थिती असताना, समाजात अशा गोष्टींना मान नसताना तू मला का स्वीकारलं?'
सागर उत्तरला, 'आई-बाबांचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्या मनावर मी भाळलो आहे. निस्सीम प्रेमाला अटी-शर्ती नसतात.'

जिस्म की बात नहीं थी उनके दिल तक जाना था 
लंबी दूरी तय करने में वक्त तो लगता है 

या ओळी गुणगुणत दोघेही एकमेकांच्या कुशीत शिरून शांत निजले. 

@ सागरराजे निंबाळकर

माहा लाडाचा ह्यो मेघ

-- माहा लाडाचा ह्यो मेघ --

मेघ पावसाळी आज
माह्या शेतामंदी आले
खेळ त्याहिचा रोजचा
काया मातीमंदी चाले

पहाटेच्या पारी मेघ
दिसे साजिरा गोजिरा
सांगे धरणी खुशीने
माहा लाखाचा ह्यो हिरा

येता जाता शेतामंदी
पानं, फुलंही भेटती
झिम्मा फुगडी खेयून
माह्या अंगाले खेटती

येता जाता रोज भेटे
गारगार थंड वारा
मंग स्पर्शाने येतसे
साऱ्या अंगाले शहारा

कधी हासतो खेयतो
कधी करी धुसपूस
तरी उजवतो रोज
काया आईची तो कूस

सदा राहो त्याची कृपा
माहा लाडाचा ह्यो मेघ
काया आईच्या भाळीची
दाट शोभिवंत रेघ

@ *सागरराजे निंबाळकर*

पंढरीची वारी

➖➖ पंढरीची वारी ➖➖

पंढरीची वारी पायी नित्य नेमाने करतो
मुखी राम कृष्ण हरी नाम आनंदे स्मरतो

पायी दिंडीत चालण्या लाखो वैष्णवांचा मेळा
रूप साजिरे विठूचे मज दिसे लाखो वेळा

ज्ञाना, तुका, नामा, जना सारे पालखीचे भोई
तुळशीचे वृंदावन इथे भगिनींच्या डोई

कशा डौलात डोलती हाती भगव्या पताका
मुखी माऊली माऊली देती एकमेका हाका

सान थोर भेद नाही सारी त्याचीच बालके
छत्र त्याचे वाटे मज उंच आभाळा सारखे

विठू दिसता सामोरी एक टिपूस गळतो
दिसभर चालूनही शीण क्षणात पळतो

किती सांगावे अप्रूप मंदिराच्या कळसाचे
सुखावती नेत्र जसे दोन क्षण विसाव्याचे

मूर्ती सावळ्या विठूची डोळी घेता सामावून
साधा सोपा मंत्र मग नाही दुजा नामाहून

देण्या निरोप भक्तांना विठू येतो वेशीवर
पुण्य वाढते वारीने ओंजळीत पसाभर

बोल त्याचे निरोपाचे पाणी पापणीत दाटे
जड होऊन पाऊले जाती आपापल्या वाटे

@ *सागरराजे निंबाळकर*

Monday, June 15, 2020

माझ्या गावचा पाऊस

------- माझ्या गावचा पाऊस -------

आठवतो अजूनही मला गावचा पाऊस 
मनसोक्त बागडून पुरी करायचो हौस

थेंब टपोरे टपोरे गंधाळून जाई माती 
सारी भावंडे मिळून गीत पावसाचे गाती

ओहोळात चालतात माझ्या तालेवार होड्या 
कधी खेळ लगोरीचा कधी एकमेका खोड्या 

चुलीवर भाजलेली मोठी मक्याची कणसं 
खाण्यासाठी गोळा होती माझी मायेची माणसं

पाच एकर शेतात ज्वारी-बाजरी पेरतो 
मळ्यातल्या झोपडीत सारे एकत्र जेवतो

फळा येते मेहनत भरघोस पीकपाणी 
डोळा आनंदाच्या धारा ओठी शिवाराची गाणी

दरी खोऱ्यात वाहती फेसाळत उंच झरे 
त्यात चिंब भिजण्याचे माझे स्वप्न होते खरे

भिजताना पावसात बिलगतो थंड वारा 
रोमरोम शहारता घेतो झाडांचा सहारा

काटा येतो कधीकधी रौद्ररूप पाहताना 
नदी काठ ओलांडून चोहीकडे वाहताना
 
माझ्या गावचा पाऊस माया करतो अमाप
त्याचे ऋण आम्हावरी तोच माय तोच बाप 

@ सागरराजे निंबाळकर

Sunday, June 14, 2020

इवलासा दवबिंदू

-- इवलासा दवबिंदू --

प्रभातीच्या वेळी जन्म 
जन्म घेती दवबिंदू 
मोती टपोर हे वाटे 
वाटे वात्सल्याचा सिंधू ।। १ ।।

थेंब थेंब चमकती 
चमकती दव ओले 
ओशाळून तृणपाती 
तृणपाती छान डोले ।। २ ।।

अल्पजीवी दवबिंदू 
दवबिंदू देती ज्ञान 
जगताना जीवनाची 
जीवनाची न्यारी शान ।। ३ ।।

गोड गुलाबी ही थंडी 
थंडी वाटे हवीहवी 
आयुष्याची सुरुवात 
सुरुवात नवीनवी ।। ४ ।।

इवलासा दवबिंदू 
दवबिंदू वाटे मोती 
त्याचा करुणेचा स्पर्श 
स्पर्श काळजाला होती ।। ५ ।।

@ सागरराजे निंबाळकर

तुझ्यामुळे आई

---- तुझ्यामुळे आई ----
(किशोरगट बालकविता)

जन्मा आलो तुझ्या पोटी 
तूच मला सांभाळले 
आज सांगतो तुला मी 
आई, माझ्या मनातले ।। १ ।।

स्वतः राहून उपाशी 
मला वाढलीस पोळी 
तरी निजली निवांत 
किती गं तू साधीभोळी ।। २ ।।

शिदोरीच्या स्वरूपात 
दिली संस्कारांची खाण 
तुझ्यामुळे आहे आई 
मला समाजात मान ।। ३ ।।

बाबा सोडून एकटे 
जेव्हा गेले देवाघरी 
तूच सांगितल्या त्यांच्या 
आठवणी कितीतरी ।। ४ ।।

माझे लाड पुरवून  
भरलीस माझी झोळी 
मला लिहूदे ना आई
तुझ्यावर दोन ओळी ।। ५ ।।

रोज सकाळी ठेवतो 
डोकं तुझ्या पायावर
आशीर्वाद, प्रेम, माया 
राहो आई माझ्यावर ।। ६ ।।

@ सागरराजे निंबाळकर

Saturday, June 13, 2020

आज्जी माझी

------- आज्जी माझी -------

काटक शरीर । उंचीने ठेंगणी 
दिसाया देखणी । आज्जी माझी !! १ !!

काठा पदराची । साडी नऊवारी 
पेहराव भारी । आज्जी तुझा !! २ !!

केसांचा अंबाडा । चष्मा डोळ्यावर 
गाते जात्यावर । दळताना !! ३ !!

बाळंतपणाचे । सर्व उपचार 
पाडतेस पार । लीलया तू !! ४ !!

आनंदाचे पर्व । मायेचा सोहळा 
नातवांना लळा । लावते तू !! ५ !!

देतो नानाविध । व्याधींना चकवा 
आज्जीचा बटवा । गुणकारी !! ६ !!

आज्जीच्या हातचा । गोड दही भात  
वाटतो लाखात । एक मला !! ७ !!

वाटते नेहमी । जावेसे आजोळी
भरावया झोळी । आठवांनी !! ८ !!

आईची आई वा । असो वडिलांची 
आज्जी या नावाची । गोडी फार !! ९ !!

गोष्टी सांगण्याची । न्यारी तिची कला 
थोपटून मला । निजविते !! १० !!

कितीतरी चुका । पोटात घालून  
घेते सांभाळून । घरदार !! ११ !!

➡️ सागरराजे निंबाळकर

चारोळी

चटका लागला हाताला
तरी आईने केली भाकर

दुःखही लाजलं हे पाहून
इतका सहज आईचा वावर

🌺 सागरराजे निंबाळकर

जय श्रीगणेशा

------- जय श्रीगणेशा -------

जय देव जय देव, जय श्रीगणेशा 
दूर कर तू भक्तांचे, भय श्रीगणेशा !! धृ !!

सुत माता पार्वतीचा, देव गजानन 
पाहुनिया एकदंता, आनंदले मन 

ब्रम्हानंदी टाळीची तू, लय श्रीगणेशा !! १ !!

वक्रतुंड, लंबोदर, कैक तुझी नावे 
साऱ्या भक्तांना ताराया, विघ्नेश्वरा यावे 

संकटांचा तूच कर, क्षय श्रीगणेशा !! २ !!

अंगारकी, चतुर्थीला, मान तुझा खास 
चराचरी विनायका, आहे तुझा वास 

येते तुझी कैकवेळा, सय श्रीगणेशा !! ३ !!

@ सागरराजे निंबाळकर

Friday, June 12, 2020

चारोळी

डोक्यावरचा हात तुझा, आई 
मला नेहमीच वाटतो सावली 

संकटांना थोपवण्याची भूमिका 
तू इतक्या सहज कशी निभावली 

@ सागरराजे निंबाळकर

Wednesday, June 10, 2020

हत्तीदादा


-- हत्तीदादा --

हत्तीदादा एकदा 
चिखलात फसला 
सगळ्यांनी ओढूनही 
निघतोय कसला 

सिंह म्हणाला आणा 
एक लांबलचक दोरी 
दोरी घेऊन आली 
एक शेळी गोरी गोरी 

दोरी आणली खरी पण 
चिखलात घेऊन जाणार कोण 
माकडाने लढवली शक्कल 
केला मासोळीला फोन 

वाघ, सिंह, गेंडा, अस्वल 
दोरी खेचून हैराण झाले 
बऱ्याच प्रयत्नानंतर हत्तीदादा 
फक्त एक इंच पुढे आले 

काय करावं नेमकं आता 
कोणालाच सुचेना काही 
जंगल पालथं घातलं 
काहीच मिळालं नाही 

शेवटी खारुताई म्हणाली 
सारे मिळून बांधू एक पूल 
चिखलात फसून हत्तीदादा 
झालाय भलताच स्थूल 

कसाबसा लोळत लोळत 
हत्तीदादा पुलावर आला 
इवल्याशा खारुताईमुळे 
एकदाचा चिखलातून निघाला 

@ सागरराजे निंबाळकर

लाडका गणपती बाप्पा

*लाडका गणपती बाप्पा*

*मला पण हवा मोदक म्हणत*
*उंदीर मामा अडून बसला*
*घट्ट बिलगून बसलेला बाप्पा*
*तो मोदक सोडतोय कसला*

*इवल्याश्या गादीवर त्या*
*बाप्पाची इवलीशी काया*
*मिठी पाहून उंदीर पुटपुटला*
*बहुधा प्रयत्न जाणार वाया*

*लाडीगोडी लावत म्हणाला मामा*
*मला फक्त छोटासा घास दे*
*नको चिंता करू अशी तू*
*आता थोडातरी हास रे*

*बाप्पाची विनवणी करून सुद्धा*
*मिळाला नाही मोदक काही*
*उंदीर मामा रागावला म्हणाला*
*तुझे वाहन होणार नाही*

*शेवटी ठरलं दोघात की*
*मिळून थोडं थोडं खाऊ*
*इकडे तिकडे लक्ष ठेव मामा*
*नाहीतर हळूच यायची माऊ*

*केली सुरूवात मोदक खायला*
*पण तो काही सरता सरेना*
*मामाला वाटायचं जास्त झालं*
*बाप्पा म्हणायचा पोट भरेना*

*संपवून कसाबसा मोदक*
*दोघेही गाढ झोपी गेले*
*पसारा पाहून आई रागावली*
*गुरू आगाव खोडकर चेले*

*अशी आहे एकंदरीत गंमत*
*एका मोदकात एवढ्या गप्पा*
*येतोय लवकरच भेटीला*
*सर्वांचा लाडका गणपती बाप्पा*

© *सागरराजे निंबाळकर*

परिताई

----- *परिताई* -----

नाचत होती आकाशात
एक छान छोटी परी
तिच्या नाचामुळे पडल्या
पावसाच्या खूप सरी

सरींसोबत खाली आली
छोटी आमची परिताई
मुलं म्हणाली तुझ्यासोबत
खेळायचं आहे बाई

परी म्हणाली या रे सारे
पाखरांना सोबत घेवून
गाऊ गाणी पावसाची
पावसामध्ये सारे जावून

तितक्यात आले फुलपाखरू
रंगीत पंख त्याचे छान 
त्याला पाहुन परिताई
विसरली आपले सारे भान

पंखावर पटकन बसून
परिताई गेली उडून
परिताई गेली म्हणून
मुलं दमली रडून रडून

तेव्हापासून परिताई
बाळांच्या स्वप्नात येते
आईबाबा पाहतात तर
बाळ झोपेत खुदकन हसते

🧸 *सागरराजे निंबाळकर* 🧸

पॅन्ट फाटली हत्तीची

"पँट फाटली हत्तीची"

हत्तीदादा उदास होते 
कोपऱ्यात एकटे बसायचे
विचारपूस केली तर  
त्यावर फार चिडायचे 

अखेर सगळ्या प्राण्यांनी मिळून 
विचारण्याचं धाडस केलं 
दादा बसले चूप शेवटी
हरिणीचं पाडस आलं 

हत्त्ती दादा बोलले बाळा
पॅन्ट माझी फाटली आहे 
कोण देईल शिवून नवी 
काळजी मनात दाटली आहे 

प्रकरण राजदरबारी गेलं 
सिंह म्हणाला हत्तीला हसवुया 
कापडाचा करून बंदोबस्त 
पॅन्ट नवी शिवून घेऊया

कपडे वाटपाचा भव्य कार्यक्रम 
पाहण्या सोहळा एकत्र गाव 
हत्ती दादा खूप नाचले 
स्टेज आमुचा तुटला ना राव 

स्टेज तुटल्याचं दुःख नव्हतं 
नवीन पॅन्ट परत फाटली 
हसले सगळे दादा चिडले
सगळ्यांनी मग धूम ठोकली

----- *सागरराजे निंबाळकर* -----

माऊ होणार डॉक्टर


-- माऊ होणार डॉक्टर --

एकदा आमची मनिमाऊ 
कोपऱ्यात बसून लागली रडू 
विचारलं तर म्हणाली
अभ्यासाला हवी पाटी नि खडू 

पाटी नि खडू दिल्यावर 
आनंदाने शाळेत जाऊ लागली 
भरपूर मार्क घेऊन तिने 
मिळवली बक्षिसं चांगली चांगली 

माऊला शाळेत भेटला 
उंदीर नावाचा मित्र 
माऊने खाऊ दिल्यावर 
काढायचा तो माऊचं चित्र 

बघता बघता माऊ 
खूप मोठी झाली 
पुढच्या शिक्षणासाठी 
तिला शिष्यवृत्ती मिळाली  

निकाल आहे आज माऊचा 
माऊ आमची होणार डॉक्टर 
हार, ढोल-ताशे घेऊन 
चला स्वागताला लवकर 

@ सागरराजे निंबाळकर

Tuesday, June 9, 2020

शायरी

गिरवीं रखे हैं कुछ मक़ान मैंने
तब कहीं जाकर ये महल पाया

मुद्दतों बाद लौटी है खुशियाँ
ए बंदे तू वक्त ना कर ज़ाया

🤗 सागरराजे निंबाळकर

शायरी

समेट लेंगे अब खुद-ब-खुद
बाहों में खुशियाँ ढेर सारी

कुछ पल के लिए ही सही
कोई फिक्र ना करे हमारी

🤗 सागरराजे निंबाळकर

Monday, June 8, 2020

निसर्ग

-- निसर्ग --

निसर्गाचे 
वरदान 
वाटे आम्हा 
अभिमान 

झाडे-वेली 
फळे-फुले 
आसमंत 
झाले खुले 

दरी-खोरे 
नदी-नाले 
रूप किती 
वेगळाले 

छंद न्यारा 
मोतियांचा  
शंख आणि 
शिंपल्यांचा 

सागराच्या 
लाटा येती 
किनाऱ्याची 
वाळू नेती 

जपू जेव्हा  
निसर्गाला 
म्हणू जन्म
सार्थ झाला 

@ सागरराजे निंबाळकर

केला सामना धैर्याने


-- केला सामना धैर्याने --

नखे मोडून टाकली
टोचणारी धारदार 
केला सामना धैर्याने 
कधी मानली न हार !! १ !!

जखडून ठेवतात 
मज रूढी-परंपरा 
कुठवर चालणार 
सांग, खेळ हा ईश्वरा !! २ !!

किती करू विनवण्या 
किती राहू विसंबून 
करावया स्वरक्षण 
सारे घेतले शिकून !! ३ !!

तुरा खोवलेला डोई
सन्मानाने शिक्षणाचा
त्याच्या साथीनेच घेते
वेध माझ्या भविष्याचा !! ४ !!

नाश केला असुरांचा
रूप दुर्गेचे घेऊन
किती काळ राहायचे
भय मनात ठेवून !! ५ !!

नको कुणाच्या कुबड्या
मीच होईन समर्थ
आशिर्वच राहो देवा
लढा जाऊ नये व्यर्थ !! ६ !!

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

चारोळी

झुळूक यावी वाऱ्याची अन
वाटावं, कोणी स्पर्शून गेलं

हे स्वप्न अधुरं राहिलेलं
मी व्यक्त कित्येकदा केलं

😇 सागरराजे निंबाळकर

Thursday, June 4, 2020

चारोळी

जेव्हा इवल्याशा हातांवर
नको तितका भार पडतो

लहानपणीच मोठं होण्याचा
प्रकार तेव्हा सर्रास घडतो

🌿 सागरराजे निंबाळकर

Wednesday, June 3, 2020

चारोळी

अल्पायुषी असतात दवबिंदू
तरी न त्यांना खेद काही

सुखी जीवन जगण्यासाठी
याहून वेगळी शिकवण नाही

🤗 सागरराजे निंबाळकर

Tuesday, June 2, 2020

आठोळी

राजा राणीच्या संसारी
झाला अडसर माझा
धाडूनिया वृद्धाश्रमी
मोठा झाला माझा राजा

एका शब्दाचाही संवाद नाही
माझ्या डोळ्यासमोर राहून
सांग बाळा काय असेल
आयुष्यात दुःख वेगळं याहून

➡️ सागरराजे निंबाळकर

चारोळी

जे शब्दांनी जमत नाही
ते डोळे बोलून जातात

हीच असते जमेची बाजू
एखाद्या नाजूक प्रसंगात

😇 सागरराजे निंबाळकर

चारोळी

दुर्दैवाने आत्ताच्या पावसात
पूर्वीसारखं भिजता येत नाही

टायटनचं घड्याळ, रेमंडचा सदरा
भिजण्यास परवानगी देत नाही

😇 सागरराजे निंबाळकर

Monday, June 1, 2020

चारोळी

सावल्यांनाही वाटत असेलच ना 
करावी कोणीतरी आपल्यावरही माया 

आडोशाच्या आशेपायी किती दिवस 
जाळून घ्यायची ही कोमल काया 

@ सागरराजे निंबाळकर

चारोळी

जर साध्या साध्या शब्दातून 
जोडली जाते अखंड नाळ 

का राहीन पारखा सुखाला 
कशी होईल शब्दांची आबाळ 

@ सागरराजे निंबाळकर

चारोळी

बदलून जातं आयुष्य
एखाद्या अनामिक वळणाने

काय करावं अशावेळी
संभ्रमित झालेल्या मनाने

➡️ सागरराजे निंबाळकर

Sunday, May 31, 2020

जयघोष प्रगल्भतेचा

----- जयघोष प्रगल्भतेचा -----

अजून किती दिवस कुढत बसायचं?
जुन्या चालीरिती पाळत
फेकून द्या साऱ्या प्रतिगामी विचारांना
वेसण घालून वेशीवर
अन होऊ द्या जयघोष प्रगल्भतेचा 
तुमच्या - आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी....

बळी दिला जातोय कोंबड्या - बकऱ्याचा
हवा तसा पाऊस यावा म्हणून 
लाखो रुपयांची मागणी होतेय
एक रुपया दानपेटीत टाकून
करतोय संघर्ष प्रगल्भतेच्या जोरावर 
अंधश्रद्धेला हाणून पाडण्यासाठी 
तुमच्या - आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी....

कोणी म्हणालं आत्मनिर्भर व्हा 
कोणी स्वदेशीचा नारा देतंय 
आज कळतंय थोडं थोडं 
अडचणीत कोण कुणाला थारा देतंय 
प्रगल्भ व्हा मित्रहो आतातरी 
मनाला संभ्रमातून बाहेर काढण्यासाठी 
तुमच्या - आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी....

कोणाला प्रगल्भ करायला जावं तर 
आपलाच दाभोळकर, पानसरे होतो 
बघूया किती दिवस चालतं हे 
मी लेखणी नव्याने हाती घेतो 
प्रसंगी तोफाही डागू जगण्यासाठी 
तुमच्या - आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी....

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा 
बाबा केव्हाच सांगून गेले 
पण वाक्य हे आम्ही फक्त 
परीक्षेत पास होण्यापुरते पाठ केले 
घेऊया शपथ संविधानाची
देशात खरा नागरिक घडवण्यासाठी 
तुमच्या - आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी....

@ सागरराजे निंबाळकर

मी अनुभवलेली कृतज्ञता आणि माणुसकी

शीर्षक :- मी अनुभवलेली कृतज्ञता आणि माणुसकी

शब्दसंख्या :- ५९०

     वर्ध्याला आमचा वाडा होता. भाजीमंडईच्या अगदी शेजारीच. देशमुखांचा वाडा म्हणून प्रसिद्ध. आज्जी-आजोबा, माझे वडील आणि त्यांचे चार भाऊ आपापल्या कुटुंबासोबत वाड्यात राहायचे. प्रत्येकाची वेगवेगळी खोली पण रात्रीच्या जेवणाला मात्र सगळे माजघरात एकत्र जमायचे. वाड्याच्या बाहेर भलंमोठं अंगण आणि त्यात एक बगीचा होता.
     
     आम्ही सगळी भावंडं आज्जी आणि आजोबांच्या खोलीत झोपायला असायचो. दोघे रोज नवनवीन गोष्टी सांगायचे त्यामुळे त्यांचा विशेष लळा होता आम्हा सर्व भावंडांना. आजोबांची परिस्थिती त्याकाळी विशेष नसल्याने त्यांनी सर्व मुलांना जेमतेम प्राथमिक शिक्षण दिलं. माझे चारही काका शेती करायचे आणि माझे वडील आमच्या वाड्याशेजारी असणाऱ्या वाण्याच्या दुकानात कामाला होते. माझ्या आजोबांना त्यांच्या मुलांचा विशेष गर्व होता. ते नेहमी म्हणायचे, 'मी पोरांना जास्त बुकं शिकवू शकलो नाही. पण, प्रामाणिक, कष्टाळू आणि निर्व्यसनी म्हणून माझ्या पोरांनी सगळ्या गावात नाव कमावलं. माझ्या सगळ्या सुनापण मला लेकीसारख्याच आहेत.'

     वृद्धापकाळाने आजोबांचं निधन झालं. त्यानंतर दोन वर्षांनी आज्जीही गेली. पुढे चालून भावंडांमध्ये थोड्या कुरबुरी होऊ लागल्या. हळूहळू भांडणं टोकाला गेल्याने वाड्याच्या वाटणीपर्यंत विषय गेला. माझ्या वडिलांनी मुंबईला येण्याचा हट्ट धरल्याने अखेर वाडा विकून आलेले पैसे पाचही भावंडात समसमान वाटून घेतले गेले. आमच्या वाड्यासमोर गवळी नावाचे गृहस्थ राहायचे. त्यांचे दोन तबेले होते त्यांनी वाडा खरेदी केला. 

     मुंबईला आल्यावर काही दिवस आम्ही भाड्याने राहिलो. बाबांना सरकारी नोकरी लागली आणि आमचे दिवस पालटले. बाबांनी स्वतःचं घर घेतलं. मी आणि माझी लहान बहीण शलाका आम्हा दोघांनाही चांगलं शिक्षण दिलं. आज मी एमबीबीएस असून माझं स्वतःचं इस्पितळ आहे. बहीण वकील झाली. सगळं आलबेल आहे पण राहून राहून वाड्याची, आज्जी आजोबांची फार आठवण येते. आज वाडा असता तर...  असा प्रश्न पडतो. 

     एकदिवस धाडस केलं आणि वडिलांजवळ विषय काढलाच ! बाबा, मला आपला गावचा वाडा परत मिळवायचा आहे. तुमचं सहकार्य मला हवं आहे. "त्या वाड्यात आता काय राहिलंय सतीश? तो वाडा अनेक वर्षांपासून बंद आहे. पडझड झाली असेल सगळी. तुला शहरातला ऐशोआराम टोचतोय का?" असं म्हणून बाबांनी नकारघंटा चालूच ठेवली. मीही हट्टाला पेटल्याने शेवटी बाबांनी तयारी दर्शवली. मी एकही पैसा देणार नाही. सगळं तू बघायचं या अटीवर.

     कधी एकदा वर्ध्याला जातोय आणि वाडा पाहतोय असं झालं होतं. जागेचा व्यवहार असल्याने शलाकालाही सोबत घेतलं. गावी पोहोचल्यावर वाडा पाहिला आणि आनंद गगनात मावेनासा झाला. गवळी काकांकडे वाड्याची चौकशी करावी म्हणून त्यांच्या घरी गेलो. माझ्या वडिलांना पाहताच म्हणाले "तू विश्वनाथ ना रे, सर्जेरावांचा धाकटा मुलगा." बाबांनी 'हो' म्हटलं. चहापान आणि औपचारिक गप्पा झाल्यावर मी गवळी काकांना वाड्याबद्दल विचारलं. ते म्हणाले "अजून मी विकला नाही कुणाला. पण तू का विचारतोस असं?'' मी त्यांना आमच्या येण्याचं प्रयोजन सांगितलं. त्यांनी तात्काळ वाड्याच्या किल्ल्या माझ्या हातात ठेवल्या आणि म्हणाले "वाडा तुमचाच आहे. ताब्यात घ्या आणि पुन्हा त्या वास्तूचं नंदनवन करा." 

     इतक्या सहज, कसलाही व्यवहार न करता काकांनी किल्ल्या दिल्याचं आश्चर्य वाटल्याने त्यांना कारण विचारलं. ते म्हणाले, "तुझे आजोबा आणि मी घनिष्ठ मित्र होतो. आज मी जो काही आहे तो तुझ्या आजोबांमुळे. माझे आई वडील लहानपणी गेले. एक मित्र म्हणून, मोठा भाऊ म्हणून तुझ्या आजोबांनी मला सहारा दिला. थोडंफार शिकलो. मिळेल ते काम करत, पैसा साठवत दोन म्हशी घेतल्या. दोन तबेले कधी झाले कळलंच नाही. माझ्या सर्जेरावाचा वाडा दुसऱ्या कुणाकडे गेला असता तर मी स्वतःला माफ करू शकलो नसतो. म्हणून मीच घेतला विकत. हे सगळं त्यावेळी सांगून उपयोगही झाला नसता. सगळ्यांच्या डोक्यात वाटणीचं भूत शिरलं होतं." हे सगळं ऐकत असताना बाबांच्या डोळ्यात अपराधीपणाची भावना आणि माझ्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. 

     आपल्याला मदत केलेल्या व्यक्तीबद्दल केवढी ही कृतज्ञता ! गवळी काकांच्या रूपात मला माणुसकी, कृतज्ञपणा जिवंत असल्याचा अनुभव आला. 
इतक्या वर्षांपासून मनाला सलत असलेली गोष्ट आज आनंदात परावर्तित झाली होती. गवळी काकांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांच्याच हाताने नारळ वाढवून वाड्याचं दार उघडलं. महिनाभर मेहनत घेऊन डागडुजी, रंगकाम, बगीचा सगळं बनवून घेतलं. 

वर्ध्यातही आता मी इस्पितळ बांधलं आहे. नाव दिलंय सर्जेराव इस्पितळ. ज्यांची परिस्थिती नाही त्यांचा इलाज मोफत केला जातो. 
आजोबांच्या मदतकार्याला, गवळी काकांच्या कृतज्ञतेला, मी अनुभवलेल्या माणुसकीला सतत जिवंत ठेवण्यासाठी !

@ सागरराजे निंबाळकर

भारताचे गुण गाता

------- भारताचे गुण गाता -------

भारताचे गुण गाता, फुलते ही छाती
डौले तिरंगा थाटात, साऱ्यांच्याच हाती !! धृ !!

शिवराय इथलेच, इथलीच राणी
गुरू गोविंदा सोबती, कबिरांची वाणी
नामा, जना, ज्ञाना झाले, इथे थोर संत
त्याच भूमीत जन्मलो, आम्ही भाग्यवंत

तुकोबांची गाथा सांगे, तू माझा सांगाती !! १ !!

भीमराव लिहितात, न्यारे संविधान
देऊ सारे मनोभावे, कायद्यास मान
लतादीदी गाती जणू, कोकिळेचं गाणं
सतावतं ए पी जेंचं, अकालीच जाणं

मैत्रीत सांगावी कृष्णा, सुदाम्याची नाती !! २ !!

कन्याकुमारी पासून, हिमालयी जाऊ
आरती नमाज सारे, एकसुरी गाऊ
होळी, बैसाखी, दिवाळी, गणपती येता
गोडी वाढते म्हणती, तिळगुळ देता

सुखाने नांदती येथे, विविधांगी जाती !! ३ !!

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

चारोळी

प्रसंगी चिमटा काढून पोटाला
ज्याने उजवल्या चार लेकी

डावललं त्याच बापाला आजन्म
दाखवून मृत्युपत्रावेळी एकी

😇 सागरराजे निंबाळकर

Saturday, May 30, 2020

चारोळी

आपलंसं करतेवेळी गेले सारे
माझ्या नकळत मला गाळून

आता काय साधायला आलेत
पश्चातापाचे चार अश्रू ढाळून

😇 सागरराजे निंबाळकर

चारोळी

छळायच्या ज्या बनून आठवणी
मीच पुसल्या त्या पाऊलखुणा

नको तेवढा जीव लावून, जेव्हा
गेला, चार दिसांचा पाहुणा 

➡️ सागरराजे निंबाळकर

Thursday, May 28, 2020

चारोळी

तिच्या जाण्याचं दुःख नव्हतं
एकटं पडण्याची वाटली भीती

होणारच होतं एकदिवस हे
एकतर्फी प्रेम टिकणार किती

🌿 सागरराजे निंबाळकर

Monday, May 25, 2020

चारोळी

आहे प्रत्येकाचे येथे
गुणदोष वेगळाले

कोणी मुकले स्वर्गाला
कोणी वैकुंठी निघाले

🌿 सागरराजे निंबाळकर

चारोळी

सूर्य जाता ढगांआड 
सांज ओशाळली जरा 

तिने चोरून पाहिला 
जेव्हा चंद्राचा चेहरा 

@ सागरराजे निंबाळकर

चारोळी

इवल्याशा रोपट्याचे
होत असताना झाड

फुलू द्यावे मनाजोगे
येऊ नये कोणी आड

🌿 सागरराजे निंबाळकर

Sunday, May 24, 2020

हरी तुझी रूपे

------- हरी तुझी रूपे -------

हरी तुझी रूपे । अनादी अनंत 
आम्ही भाग्यवंत । भक्तगण !! १ !!

दशावतारात । केले आगमन  
सृष्टीचे पालन । करावया !! २ !!

मत्स्याच्या रूपात । केले आक्रंदन 
समुद्रमंथन । झाले पहा !! ३ !!

मेरू पर्वताला । आधार देऊन
धरले तोलून । पाठीवर !! ४ !!

वराहावतारी । पृथ्वी उचलली
साऱ्यांना दावली । राजशक्ती !! ५ !!

हिरण्यकश्यपू । राक्षसाचा नाश 
अवतार खास । नृसिंहाचा !! ६ !!

तीन पावलांच्या । जमिनीचा मेळ
अनोखा हा खेळ । बळीसाठी !! ७ !!

केशव माधव । हरी जनार्दन 
विष्णू नारायण । नावे तुझी !! ८ !!

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Saturday, May 23, 2020

चारोळी

वाचा असती, जर का व्यथांना
मनसोक्त बोलल्या असत्या त्याही

तेवढाच मिळाला असता त्यांना
थोडक्याशा सांत्वनाने दिलासा काही

🤗 सागरराजे निंबाळकर

Friday, May 22, 2020

चारोळी

यत्न करूनही लाख
लागला न कधी मेळ

अवघड का इतुका
एका भाकरीचा खेळ

🌿 सागरराजे निंबाळकर

चारोळी

काळवेळ पाहून मीही
शिकलो स्वतःला सावरायला

तसा वेळ लागतोच म्हणा
पसारा कोणताही आवरायला

🌿 सागरराजे निंबाळकर

Thursday, May 21, 2020

चारोळी

उपयोग तसा काहीच नाही
काय करू मी आठवणी ठेवून

शक्य असतं तर दिल्याच असत्या
ज्याच्या त्याला, परत नेऊन

😇 सागरराजे निंबाळकर

चारोळी

वर्तमानातून काढून उसंत
पाहिलं भूतकाळाकडे वळून

उच्छाद मांडला आठवांनी
गेल्या, पुन्हा एकदा छळून

😇 सागरराजे निंबाळकर

भेट साजणी

वृत्त :- कलापति (प्रत्येक ओळीत १३ वर्ण)

गालगाल गालगाल गालगाल गा  

यती आठव्या आणि तेराव्या अक्षरावर 

--------- भेट साजणी ---------

प्रेमपत्र रोज रोज, धाडली जरी 
भेट साजणी हसून, एकदा तरी !! धृ !!

प्रीत आगळी जगात, आपुली सये 
दृष्ट तीज कोणतीच, लागता नये 
साजणी तुझेच वेड, लागले मला 
तूच श्वास तूच ध्यास, अंतरातला  

नाव कोरले तुझेच, काळजावरी !! १ !!

काय नेमके मनात, सांगना प्रिये 
पाहण्या मला वळून, थांबना प्रिये 
शल्य फक्त एवढेच, बोचते मना 
जायला नको कधीच, व्यर्थ प्रार्थना 

ठेवते मला कितीक, तू अधांतरी !! २ !!

गारव्यातली पहाट, स्वप्नही नवे
माग साजणी सदैव, जे तुला हवे
घेतले मिठीत आणि, लाजली सखी 
नाव ठेवले तिनेच, रत्नपारखी 

जीव गुंतला तुझ्यात, गोष्ट ही खरी !! ३ !!

@ सागरराजे निंबाळकर

Tuesday, May 19, 2020

देव आहे चराचरी

-- देव आहे चराचरी --

देवालयी देव नाही 
कुठे शोधू मग त्याला 
प्रश्न इतुका भाबडा 
नित्य पडतो मनाला !! १ !!

इथे तिथे नका शोधू 
देव आहे चराचरी 
फक्त ओळखा तयाला 
योग्य मार्गाने सत्वरी !! २ !!

भुकेल्यास देतो अन्न 
तहानल्या थोडं पाणी
देव मानावे त्यालाच 
हेच सांगे संतवाणी !! ३ !!

कधी काळ देव झाला 
कधी वैद्य देव होतो 
भाग श्रद्धेचा हा सारा 
घेई जाणूनिया जो तो !! ४ !!

चार आणे असो किंवा 
नड लाख रुपयांची 
भरा सढळ हाताने 
ओटी गरजवंताची !! ५ !!

ध्यानीमनी नसताना 
देवापरी जो धावतो 
आशीर्वच त्याचा थेट 
काळजात सामावतो !! ६ !!

देव मानून कर्माला 
मूर्ती होतसे साकार 
देव वसतो तेथेही 
भक्तिभाव निराकार !! ७ !!

प्रत्येकात दिसतील 
नानारुपे ईश्वराची 
जर जाहली जागृत 
संवेदना मानवाची !! ८ !!

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर 
मो - ८८७९८९७७९७

Monday, May 18, 2020

चारोळी

आशा-अपेक्षांच्या ओझ्याखाली 
जगणं, राहून गेलं थोडं 

सोडवता आलं असतं, पण 
कधी उमगलंच नाही, हे कोडं

@ सागरराजे निंबाळकर

Saturday, May 16, 2020

भाग्य लागते मिळाया

-- भाग्य लागते मिळाया --

भाव मैत्रीतले सारे 
मनी ठेवले जपून 
नाही पडला तयांचा 
मज विसर अजून 

दिसामागे दिस जाता 
मैत्री होत गेली घट्ट 
कसा करू नये मग 
रोज भेटण्याचा हट्ट 

डोळे बोलके तुझे नि 
एक खळी गालावर 
सांग तूच आता मज 
कसे यावे भानावर 

नियमित संवादाने 
कळू लागला स्वभाव 
आपसूक येत गेले 
माझ्या ओठी तुझे नाव 

वाटा मोलाचा तुझाही
माझ्या हळव्या क्षणात 
तूच निशा चांदण्यांची 
तूच सोनेरी प्रभात 

झाल्या काही कारणांनी 
वाटा अपुल्या वेगळ्या
कुठे भेटगाठ मग 
कुठे गप्पा त्या मोकळ्या 

काळ लोटला बराच 
पुन्हा आली तुझी साद 
काय झाले, कसे झाले 
नको आता काही वाद 

भाग्य लागते मिळाया 
अशी मैत्री जीवनात 
बरसोत आता फक्त 
सुखसरी अंगणात 

@ सागरराजे निंबाळकर

चारोळी

नजरेतूनच व्यक्त झालो व्हायचं ते
ओठांनी फक्त, प्रतिनिधित्व केलं

अंतर राखूनही एखाद्याशी असं
पाहिलंय? इतकं समीप आलेलं

😇 सागरराजे निंबाळकर

चारोळी

इतक्या वर्षानंतरही सये
नातं अपुलं, तसंच राहिलं

हस्तांदोलनागोदर जेव्हा आपण
एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं

🤗 सागरराजे निंबाळकर

Friday, May 15, 2020

कुणाचे किती

------- कुणाचे किती -------

कुणाचे किती नोंदवू बारकावे 
(कुणी शांत सज्जन कुणी आगलावे)

घरंदाज तू वाटला ना कधीही 
जरी जोडली छानशी आडनावे 

हवन यज्ञ केले बदलल्या न रेखा 
अता हात माझे कुणा दाखवावे 

कधी लागली ठेच वाटेवरी जर 
सख्या वाटते, तू मला सावरावे

उगा शोधते प्रेम चोहीकडे तू 
दिसेनात गालांवरी तुज पुरावे

पसंती तिची मज कधी ना समजली
मनाने उगा घेतले हेलकावे

दिवा मंद केला नि निजलो उपाशी 
भुकेला कसे अन, किती समजवावे

@ सागरराजे निंबाळकर

चारोळी

तिच्या गुंतागुंतीच्या प्रश्नांवर
दिली मी, साधी सरळ उत्तरे

तरी समाधान झालं ना तिचं
आता अबोलच राहिलेले बरे

😇 सागरराजे निंबाळकर

Wednesday, May 13, 2020

चारोळी

जीवापाड प्रेम होतं कधीकाळी
आज तिला, माझी भीती वाटते

कसं विसरावं तेही कळेना, कारण
दूर व्हायलाही ती, प्रेमानेच सांगते

😇 सागरराजे निंबाळकर

Tuesday, May 12, 2020

आता सावराया हवे

-- आता सावराया हवे --

विसरून झाले गेले 
आता सावराया हवे 
घेण्या आयुष्यात खूप 
अनुभव नवनवे 

कोण अपुला-परका 
वेळोवेळी ओळखावे 
भावनेत कुणाच्याही 
कधी आहारी न जावे 

नको फळाची अपेक्षा 
कर्म करत रहावे 
आहे नियम जगाचा 
ज्याचे त्यानेच पहावे 

नाजूकसे समजून 
फुल लावले छातीला 
त्रास बोचऱ्या काट्यांचा 
झाला निष्पाप पाठीला 

बोध यातून घेतला 
थोडे ठेवावे अंतर 
नाही करावी लागत 
येथ काळजी नंतर 

@ सागरराजे निंबाळकर