Monday, November 4, 2019

दो घडीचा पाहुणा

🍃        दो घडीचा पाहुणा       🍃

वाहता सुखाचे वारे । खळखळती किनारे
समाधानाचे निवारे । गवसतात जैसे !! १ !!

आयुष्याचा ठोकताळा । सांगतो संयम पाळा
वाढतो मग जिव्हाळा । उंच वेलीप्रमाणे !! २ !!

चारचौघात वावर । थांबा जरा क्षणभर
असले जरी नश्वर । सांगाडे आयुष्याचे !! ३ !!

दुःख देऊ नको कुणा । दो घडीचा तू पाहुणा
राहोत पाऊलखुणा । घे काळजी इतुकी !! ४ !!

गुज सागराचे आता । ऐकशील येता जाता
माय बाप अन त्राता । जगी साऱ्यांचा एक !! ५ !!

🍃 सागरराजे निंबाळकर 🍃

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !