▪️मला काय मिळालं..?
पाखरू एक, आलं तसं निघालं
शेवटी, मला काय मिळालं..? ।।धृ।।
सुखदुःखे सारी, आपली मानली
कळत-नकळत, प्रीत वाढली
कधी मी कधी ती, पुढे आलो
सहज क्षणात, एकमेकांचे झालो
वाचून डोळे, मनातलं
न सांगताही, सर्व कळालं ।।१।।
हळूहळू, होत राहिली सलगी
कधी प्रेम कधी, वादाची ठिणगी
नजरेत आल्या, चुका काही
प्रयत्न सलोख्याचे, मी सोडले नाही
हिरवंगार, शिवार प्रेमाचं
माझ्या, नजरेदेखत जळालं ।।२।।
वाटलं तेव्हा, केलं जवळ-दूर
खात राहिली, जीवाला हुरहूर
वापर राजाचा, खुबीने केला
चेहरा हसरा, झाला रडवेला
कशा पुसायच्या स्मृती आणि..
कसं म्हणावं, झालं ते झालं ।।३।।
पैशापुढे प्रेमाला, किंमत नसते
खरेपणावर दुनिया, मिश्किल हसते
असतात खोट्या, शपथा, आणाभाका
कुठवर मारायच्या, केविलवाण्या हाका
पैशाने मिळतं, हवं ते सारं
थोडं उशिराच, ध्यानात आलं ।।४।।
🌿 सागरराजे निंबाळकर