Sunday, January 31, 2021

बाहुली, पोपट

➖➖ *विचारधन - ६१* ➖➖

एखादी जबाबदारी, पद स्वीकारताना आपल्या कर्तृत्वाला वाव मिळणार आहे की फक्त बाहुली म्हणून काम करायचं आहे याची एकदा खात्री करून घ्यावी.

पोपट दिसायला सुंदर असतो पण तो पिंजऱ्यात आहे की झाडावर हेही महत्वाचं आहे !

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Friday, January 29, 2021

मर्यादा

➖➖ *विचारधन - ५९* ➖➖

प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते पण, ती आपण कशाप्रकारे पार करतो त्यावर आपली कृती चांगली की वाईट हे ठरवलं जातं.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Thursday, January 28, 2021

सिंहासमोर लढण्याची तयारी

➖➖ विचारधन - ५८ ➖➖

अस्वलासमोर निपचित पडून जीव वाचवण्यापेक्षा, सिंहासमोर लढण्याची तयारी ठेवणे म्हणजे निधड्या छातीने संकटांवर मात करायला शिकणे होय. 

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Wednesday, January 27, 2021

व्यक्ती आणि भक्ती

➖➖ *विचारधन - ५७* ➖➖

हक्काची व्यक्ती आणि निस्सीम भक्ती अडीअडचणीच्या वेळी नक्कीच कामाला येते फक्त साद मनापासून हवी !

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Tuesday, January 26, 2021

सफलतेचा ध्वज

➖➖ *विचारधन - ५६* ➖➖

कष्ट, जिद्द आणि कर्तृत्व. आयुष्यातले असे तीन रंग जेव्हा एकत्र येतात तेव्हा 'सफलतेचा ध्वज' तयार होतो.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Monday, January 25, 2021

अपेक्षा आणि उपेक्षा

➖➖ *विचारधन - ५५* ➖➖

चुकीच्या व्यक्तीकडून ठेवलेली 'अपेक्षा' आणि आपली पात्रता असतानाही झालेली 'उपेक्षा' दोन्हीही अनुभव म्हणून स्वीकारणे म्हणजे सुखी, समाधानी जीवनाकडे केलेली वाटचाल.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Saturday, January 23, 2021

समंजसपणा

➖➖ *विचारधन - ५३* ➖➖

काही गोष्टींकडे 'लक्ष' द्यायचं, काही गोष्टींकडे 'दुर्लक्ष' करायचं या दोहोतली कसरत म्हणजे 'समंजसपणा'.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Wednesday, January 20, 2021

मदतीचं गाजर

➖➖ *विचारधन - ५२* ➖➖

गरजवंताला दाखवलेलं 'मदतीचं गाजर' आणि 'पाषाण' हृदयाला फुटलेला 'पाझर' दोन्हीही असं नाटक ज्याचा प्रत्येक प्रयोग वेगळा असतो.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Tuesday, January 19, 2021

पहिली गोष्ट विसरण्यासाठी

➖➖ *विचारधन - ५१* ➖➖

पहिली गोष्ट विसरण्यासाठी दुसऱ्यात मन रमवावं लागतं.

शल्य देतेच दुनिया आपसूक. ते विसरण्याचं कौशल्य आपलं आपल्यालाच कमवावं लागतं.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Monday, January 18, 2021

ध्येय आणि सफलता

➖➖ *विचारधन - ५०* ➖➖

आपलं ध्येय नक्की करून जर त्याच दिशेने वाटचाल केली तर सफलता १००% मिळते.

बघू, करू, सांगतो अशा बाकांवर विसावा घेतला की विषय संपला !

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Sunday, January 17, 2021

पराक्रमाची नोंद

➖➖ *विचारधन - ४९* ➖➖

इतरांना अशक्य वाटणारी गोष्ट जेव्हा आपण शक्य करून दाखवतो तेव्हाच आपल्या 'पराक्रमाची नोंद' होते.

त्यामुळे स्वतःला सिद्ध करा, प्रसिद्ध आपोआप व्हाल.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Saturday, January 16, 2021

नाइलाजाचे नियम

➖➖ *विचारधन - ४८* ➖➖

एखादी व्यक्ती आपल्याला सतत टाळत असेल तर, तिला वेळीच आयुष्यातून गाळलं पाहिजे.
अन्यथा भविष्यात तिच्याशी होणाऱ्या प्रत्येक संवादात नाइलाजाचे नियम पाळावे लागतात.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Friday, January 15, 2021

काट्यातही फुलायचे

सानी मिसरा सौ. आसावरी जाधव यांच्या एका गझलेचा

▪️▪️

काट्यातही फुलायचे
(जीवन असे जगायचे)

घर ठेवते अखंड जी
आई तिला म्हणायचे

डोळ्यात पाहिल्याविना
नाही खरे कळायचे

शिकली कुठे कसब प्रिये
स्वप्नी मला छळायचे

जगणे सये तुझ्याविना
नाही मला जमायचे

खोटे किती खरे किती
आहे अजुन ठरायचे

योद्ध्यापरी लढू सदा
इतक्यात ना हरायचे

▪️सागरराजे निंबाळकर

Monday, January 11, 2021

व्याख्या वास्तवाची

▪️ व्याख्या वास्तवाची ▪️

स्वप्नांची दुनिया । असते क्षणांची
खात्री आनंदाची । नाही त्यात ।।१।।

गोष्टी अधांतरी । करू नये कधी
हातात अवधी । असताना ।।२।।

वेळीच जाणावे । मोल जीवनाचे
भान वास्तवाचे । ठेवोनिया ।।३।।

उत्तुंग वाटतो । इवलासा हर्ष
वास्तवाचा स्पर्श । झाल्यावर ।।४।।

भौतिक सुखाचा । नको बडेजाव
वास्तवाचा ठाव । घ्यावा नित्य ।।५।।

कितीही वाटले । न्यावे सर्वकाही
नेता येत नाही । शेवटाला ।।६।।

मनातली मूर्ती । आकारास येते
साक्ष साऱ्या देते । वास्तवाची ।।७।।

व्याख्या वास्तवाची । आहे साधी-सोपी
घालू नये टोपी । कधी कोणा ।।८।।

▪️ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

परिपूर्णतेकडे पहिलं पाऊल

➖➖ *विचारधन - ४६* ➖➖

एखादी व्यक्ती आपल्या प्रत्येक गोष्टीत चूक काढत असेल तर ती परिपूर्णतेकडे जाणारी पहिली पायरी मानून सुधारणेचं एक-एक पाऊल पुढे टाकत गेल्यास शेवटाला सफलतेचं शिखर गवसतंच !

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Sunday, January 10, 2021

मदत आणि व्यवहार

➖➖ *विचारधन - ४५* ➖➖

परताव्याची अपेक्षा न ठेवता केली जाते ती 'मदत'. 
अपेक्षा ठेवली की तो 'व्यवहार' होतो.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Saturday, January 9, 2021

आयुष्य मोजायचं की योजायचं

➖➖ *विचारधन - ४४* ➖➖

गेलेलं आयुष्य 'मोजायचं' की उरलेलं 'योजायचं' यातला संभ्रम दूर झाला की आपण सुख, समाधान, शांततेच्या समीप जातो.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

सत्कर्माला निस्वार्थीपणाची जोड

➖➖ *विचारधन - ४३* ➖➖

सत्कर्माला निस्वार्थीपणाची जोड दिल्यास मिळणारं समाधान आपला चेहरा आणि अंतरात्मा दोन्हीकडे परावर्तित होतं.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Wednesday, January 6, 2021

एखाद्यासाठी जळणं

➖➖ *विचारधन - ४२* ➖➖

'एखाद्यासाठी' जळणं आणि 'एखाद्यावर' जळणं यातला फरक जरी कळला तरी आपलं जीवन सार्थकी लागलं असं समजावं !

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Tuesday, January 5, 2021

कर्म, धर्म, मर्म

➖➖ *विचारधन - ४१* ➖➖

'कर्म' करताना 'धर्म' मध्ये आणल्यास जीवनाचं 'मर्म' कळत नाही !

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Monday, January 4, 2021

नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व

➖➖ *विचारधन - ४०* ➖➖

नेतृत्व स्वीकारणं सोपं आहे पण ते करणं कठीण आहे. त्यासाठी कर्तृत्व आणि वक्तृत्व दोन्हींची जोड द्यावी लागते.
अन्यथा तो फक्त दिखावा होतो !

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Sunday, January 3, 2021

गुंतलेला जीव आणि जाणीव

➖➖ *विचारधन - ३९* ➖➖

एखाद्या व्यक्तीत गुंतलेला जीव आणि त्या व्यक्तीला त्याची असणारी जाणीव प्रेम सफल करते.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७