~ दरी ~
घट्ट नात्यात जर खोल झाली दरी
पावलोपावली छेद करते उरी
लागतो कोण मी सांग दुनिये तुझा
काढते आठवण प्राण गेला तरी
वार झाला तरी लागली ना खबर
काय कावा तुझा ! चाट पडली सुरी
फार काही नको फक्त कर एवढे
दे मला तू "अहो" हाक आतातरी
सत्य मानू कसे? वैद्य आहे कुशल
एकदाही जखम होत नाही बरी
▪️सागरराजे निंबाळकर