Wednesday, July 3, 2019

भली मोठी कथा

--- भली मोठी कथा ---

आहे का सत्ता कुणाची
चालणाऱ्या श्वासांवर
कधी वास्तवाचा दाह
कधी रोष भासांवर

दाखवावे कुणा कसे
मेघ डोळी दाटलेले
जोड ठिगळांची देता
पुन्हा पुन्हा फाटलेले

मूक संवाद काहींचा
कुणी टाळती नजर
अंत्ययात्रेवेळी मात्र
नित्य नेमाने हजर

काही ओठी जयघोष
कुठे उद्धार नावाचा
दोष वेशीला का देऊ
रस्ता चुकता गावाचा

चित्र हेच चोहीकडे
प्रत्येकाची हीच व्यथा
कशी सांगू चारोळीत
माझी भली मोठी कथा

😊 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !