-- शेवटाला काही नाही --
कसा मांडावा नेमका
लेखाजोखा भविष्याचा
मतलबी जगतात
आहे प्रश्न ज्याचा त्याचा
माझे माझे करताना
शेवटाला काही नाही
हेच सत्य अंतिम तू
पूस दशदिशांनाही
येता जाता भेटतात
फक्त वारे, वाहणारे
हाल हवाल कुणाचा
कोण पाणी पाजणारे
भेगाळली भुई माझी
केली आसवांनी ओली
माझी मलाच ठाऊक
माझ्या यातनांची खोली
कधी हेटाळणी भाळी
कधी काळजाला चरे
वाटे मग गर्दीतून
दूर राहिलेले बरे
🙂 सागरराजे निंबाळकर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !