-- काय असेल उत्तर --
पावसाच्या चिंब सरी
तिचं ते जवळ येणं
स्पंदनांची भाषा अन
नजरेनं देणं घेणं
जुळलेली सरगाठ
प्रयत्नाने व्हावी पक्की
डोळे देतात होकार
ओठांचंच नाही नक्की
छत्री असूनही तिचा
चिंब भिजण्याचा हट्ट
वीज कडाडता नभी
मला बिलगणं घट्ट
हीच का नांदी प्रेमाची?
कसं विचारावं तिला?
काय असेल उत्तर
प्रश्न पहिला वहिला
@ सागरराजे निंबाळकर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !