Wednesday, December 5, 2018

काव्यांजली आम्ही भाग्यवान

--- जाहलो भाग्यवान आम्ही ---

महाराष्ट्र भूमीतल्या
संत परंपरेचा सन्मान
आम्ही भाग्यवान
पाहतो

निश्चयाचा महामेरू
राजा छत्रपती महान
आम्ही भाग्यवान
मावळे

गिरविताना अक्षरे
देई शारदा वरदान
आम्ही भाग्यवान
कविराज

लाभले दर्शन
जाहलो भाग्यवान आम्ही
समर्थ स्वामी
अक्कलकोटचे

भाग्यवान आम्ही
कोण कुठून आलो
इथलेच झालो
कायमचे

सहवास भाग्यवंतांचा
लाभावा सकळ जनास
मिळतो मनास
दिलासा

भाग्यात माझ्या
काय कोणास ठावूक
होतो भावूक
क्षणोक्षणी

भाग्यवंतांना मिळतो
विसावा आईच्या कुशीत
जाईजुईच्या मिठीत
फुलणारा

भाग्यवान सरितेशी
होतो संगम सागराचा
सोहळा जागराचा
सांजसमयी

@ *सागरराजे निंबाळकर*
        उल्हासनगर, ठाणे

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !