----- जन्म सागराचा कित्येकवेळा -----
(षोडशाक्षरी)
एकांतात भरलाय तुझ्या आठवांचा मेळा
गेले राहून सांगायचे तुला, कित्येकवेळा
कोण कुठला मी? अन काय नाव गाव माझे
प्रयत्न करतो आठवायचा, कित्येकवेळा
अशाच एका वळणावर भेट झाली तुझी
पाहता डोळ्यात मी हरवलो कित्येकवेळा
भय वाटूनही केलंच धाडस एकदाचं
कधी होशील माझी? विचारू मी कित्येकवेळा
मिचकावले डोळे तू, सारून बट हलकी
माझा न राहिलो, झालो तुझाच कित्येकवेळा
तू माझी, मी तुझा राहू साथ आता जन्मभर
परिक्रमा जीवनाची करूया कित्येकवेळा
येता सामोरी प्रेम हे, द्वंद्व झाले भावनांचे
समाधानाने जिंकलं मी, सुख कित्येकवेळा
नको दुजाभाव उजळवण्या हे घर सारे
तू व्हावे दीप, मी होईन ज्योती कित्येकवेळा
देऊन सत्व अनंती विलीन झाली सरिता
तिच्याचसाठी जन्म सागराचा कित्येकवेळा
@ *सागरराजे निंबाळकर*
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !