Monday, December 3, 2018

गझल :- व्योमगंगा

भोग माझ्या प्राक्तनाचे भोगुनी झालेत सारे
यापुढे खुलतील नक्की ही यशाची बंद दारे

वाट आहे खाच खळग्यांनी जरी ही व्यापलेली
स्वागताला माझिया हे मोरपंखांचे पिसारे

भाळलो मी का उगा त्या पौर्णिमेच्या चांदणीला
येथ असता सोबतीला सूर्य आणिक चंद्र तारे

कोणता हा खेळ आहे लाट येते आणि जाते
काय सांगू वाहती कोण्या दिशेला श्वेत वारे

घालता हा पांढरा सदरा उभा मी संसदेला
वाटते मग हेच ते अच्छे दिनाचे सौम्य नारे

पुण्य झाले पांगळे आणिक लुळे सत्कार्य येथे
लागला थोडा जरी धक्का तिथे आरेस कारे

लोकशाही येथली आता कुठे कोणास प्यारी
राज्य आहे दुर्जनांचे म्हणत थोडंसंच खारे

@ *सागरराजे निंबाळकर*

काफिया-तारे,वारे,नारे, कारे,खारे, आरे,मारे,घारे

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !