*आरास दिव्यांची*
(चित्र सौजन्य - शीतल दौंड)
आरास दिव्यांची
माझिया मनास भावते
हळूच खुणावते
दीपावली !! १ !!
हसऱ्या वदनाने
तेवती दीप ज्योती
उजळोत नाती
संसारात !! २ !!
साजशृंगार तुझा
साथीला आभूषणे मौल्यवान
मानतो भाग्यवान
स्वतःला !! ३ !!
प्रवेश तुझा
सुखावतो मज जीवनी
सुखांची हमी
सदोदित !! ४ !!
टपोर चांदण्यांचा
अंगणी तेजोमयी प्रकाश
उजळावे यथावकाश
तारांगणी !! ५ !!
तळपत्या धरेवर
तुझी *शीतल* छाया
आपुलकीची माया
सावलीसारखी !! ६ !!
सागर सरितेच्या
*शीतल* संगमात न्हाला
दिवाळी पहाटेला
सर्वांभूती !! ७ !!
@ *सागरराजे निंबाळकर*
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !