Wednesday, October 3, 2018

स्वप्न पाहिले मी

वृत्त :- चंद्रकांत
मात्रा :- २६ (८+८+८+२ = २६)

टिमटिमणाऱ्या तिमिराचे हे स्वप्न पाहिले मी
विसरलो अता असे नेमके काय पाहिले मी

भास जाहला स्पर्शून जणू जात असावी ती
पाहताच तो चाफा कळले तिला पाहिले मी

हृदयाची ही तगमग सखये घे जाणूनी तू
रुसवे फुगवे शोभत नाही हास्य पाहिले मी

तुला कळेना मला कळेना भास कोणते हे
टाळली नजर तू क्षणात जी तिला पाहिले मी

देणे घेणे रीती रिवाज नको म्हणाली तू
किंमत माझी करताना गे तुला पाहिले मी

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !