🌿 *भारतीय सण आणि एकात्मता* 🌿
करावी साजरी दिवाळी
सद्भावनेचा फराळ वाटून
सुरकुंब्यात पाहता करंजी
उर माझा आला दाटून
होळीच्या रंगात नाहताना
भान कुणा, सारेच दंग
गुण्यागोविंदाचा संदेश देई
विविधतेत एकात्मतेचा रंग
कधी हात ठेवावा बायबलवर
कधी छातीशी लावावं कुराणाला
गीता दावते मार्ग जगण्याचा
कसं विसरावं मी झेंद अवेस्ताला
(झेंद अवेस्त पारशी ग्रंथ आहेत)
चिन्ना, अयंगार स्वामी जसे
तशीच तिन्ही जगाची आई
गुरु ही आपला बाबा ही आपले
कोण शीख अन कोण इसाई
बैसाखीत होतो भांगडा जसा
तसेच गणेशोत्सवात भजन
त्यागले प्राण ज्यांनी देशापायी
त्यांना करावे शत शत नमन
मारून मिठी कडकडून एकमेका
द्या साऱ्यांना जिवाभावाची ईदी
कधी मन रमतं माझं गोकुळी
कधी म्हणतं, चला जाऊ आळंदी
इथेच अमृतसर इथेच गंगा
इथेच दिसेल मथुरा काशी
आदाब, सत श्री अकाल, नमस्कार
सारे पुजले मी, माझ्या काळजाशी
व्हावी जयंती शिवबा, बाबाची
जन्मोत्सव अमर तथागतांचा
झेंडे वेगवेगळे टोचती नजरेला
सेवेकरी मी माणुसकीच्या पंथाचा
वटपौर्णिमा, कोजागिरी, नागपंचमी
दृश्य जसा सामुदायिक सोहळा
विविधतेतही एकत्र नांदणारा
माझा भारत आगळावेगळा
अशीच राखावी सुख समृद्धी
साऱ्यांना हात जोडून मागणं
सागर सरितेच्या कृपादृष्टीने
पडावं ग्रीष्मात शरदाचं चांदणं
@ *सागरराजे निंबाळकर*
उल्हासनगर, ठाणे
८८७९८९७७९७
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !