Thursday, October 4, 2018

स्वप्न पाहिले मी (व्योमगंगा गझल)

➖ स्वप्न पाहिले मी ➖

पाहिले मी स्वप्न येथे मम सुखाच्या जीवनाचे
आज कळले फक्त होते खेळ सारे ते मनाचे

राज्य करण्या राम येता खूप मज आनंद झाला
स्वप्न तुटता सत्य कळले राज्य आहे रावणाचे

स्वप्नपूर्ती जाहली कळताच वार्ता त्या जयाची
उमगले कालांतराने कर्ज फुटल्या कांकणाचे

स्वप्न बघता वाटले की जाहलो आहे अमर पण
श्वास होते सोबतीला पाहुणे काही क्षणाचे

पाहतो झोपेत मी ही रोज का स्वप्ने सुखाची
जाग येता दुःख दिसते पैलतीरी सागराचे

© *सागरराजे निंबाळकर*
        उल्हासनगर, ठाणे

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !