Thursday, November 4, 2021

रोज दिवाळी

▪️रोज दिवाळी..

पूर्व दिशेला, येता भानू
"सकाळ" माझी, प्रसन्न झाली
तेज घेऊन, लक्ष दिव्यांचे
औक्षण करण्या, दारी आली

सुखात जावो, जीवन अवघे
भेटीगाठी, सांजसकाळी
फराळ वाटू, आनंदाचा
करू साजरी, रोज दिवाळी

▪️सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !