🎯 गमक यशाचे..
घेण्या उत्तुंग भरारी
पंख लाभो गरूडाचे
कष्ट, संयम, चिकाटी
आहे गमक यशाचे
यश, ऐश्वर्य, कीर्तीचा
वेल भिडो गगनाला
पाय जमिनीलगत
राहो प्रत्येक क्षणाला
कधी मलमल कधी
खाचखळग्यांची वाट
सत्कर्माने उगवते
नित्य सुखाची पहाट
झेप शिकवते छान
एक धडा प्रत्येकाला
लीन जेवढा चरणी
तितकाच मोठा झाला
पंख असो कोणतेही
त्यात शिरू नये हवा
झेप घेताना मिळतो
रोज अनुभव नवा
🌿 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८ ७९८९ ७७९७
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !