Friday, November 26, 2021

सोडू नये धीर

▪️सोडू नये धीर

जटील समस्या । परीक्षा बघते
अशक्य वाटते । सर्वकाही ।।१।।

संकटात कधी । सोडू नये धीर
लावून अबीर । संयमाचा ।।२।।

असते उत्तर । प्रत्येक प्रश्नाला
चालना मनाला । दिली जर ।।३।।

तोल ढळल्यास । पुन्हा सावरावे
हळूहळू जावे । ध्येयापाशी ।।४।।

प्राप्त होते सिद्धी । तपश्चर्येमुळे
उद्धारावी कुळे । सन्मार्गाने ।।५।।

🌿 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !