Thursday, November 25, 2021

स्वप्नांची आखणी

🎯 स्वप्नांची आखणी

जुन्या आठवांचा । घालूनिया मेळ
खेळूयात खेळ । भविष्याचा ।।१।।

नकळत जे-जे । गेले हातातून
दुःख मागाहून । नको त्याचे ।।२।।

जमाना भल्याचा । उरलेला नाही
खोटी कार्यवाही । जिथे-तिथे ।।३।।

मनामध्ये एक । ओठांवर दुजे
होती सारे खुजे । क्षणोक्षणी ।।४।।

सुखी, समाधानी । व्हावे सारेजण
वेचूयात कण । सन्मार्गाचे ।।५।।

स्वप्नांची आखणी । यथायोग्य करू
ओंजळीत भरू । सुखदुःख ।।६।।

लांघू संयमाने । प्रपंच सागर
करून आदर । भावनांचा ।।७।।

🌿 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !