🌹 मिठीचा सहारा..
सखे गुलाबी थंडीत
झोंबतोय गार वारा
आठवतो अशावेळी
तुझ्या मिठीचा सहारा
पसरली चोहीकडे
दाट धुक्याची चादर
पाना-पानावर जसा
शुभ्र दवाचा वावर
तुझ्या बटेला सारत
करू का मी लाडीगोडी
तुझ्या एका इशाऱ्याने
सुटतील सारी कोडी
मला ओढून जवळ
घट्ट देते आलिंगन
खरं-खरं सांग प्रिये
कसे ओळखते मन
विझवूया दिवे आता
रात्र बहरात आली
माझ्या ओठांना कळूदे
तुझ्या ओठांची खुशाली
🌿 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !