Thursday, November 11, 2021

येईल गाव

सुंदर हिरवे येईल गाव
बोट नाखवा किनारी लाव

वरवर असते कौतुक सारे
कोण पाहतो आतले घाव

आत घेतात चढ्या दराने
बाहेर मात्र करतात भाव

पैसा-अडका सगळं आहे
पण ममतेचा प्रचंड अभाव

कधी न कळला मला विसावा
पळत राहिलो उगा भरधाव

निष्फळ ठरल्या चर्चा म्हणून
ज्याचा-त्याने घेतला ठाव

कुणाकुणावर संशय घ्यावा
प्रत्येकाचे वेगळे डाव

🌿 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !