Wednesday, November 30, 2022

दर्शन द्या मला

🌺 दर्शन द्या मला

भगवंता शेवटचे, दर्शन द्या मला
योग एकदाचा आता, येऊद्या चांगला ।।धृ।।

नाम तुमचे मुखात, तीनही प्रहरी
विठोबा तुम्हीच माझे, तुम्हीच श्रीहरी

नाद टाळ मृदंगाचा, कानात भिनला ।।१।।

काही केल्या येत नाही, चित्ती समाधान
कळेना करावे कसे, सुखाचे निदान

वनवास प्रपंचाचा, फार मी भोगला ।।२।।

चरणी तुमच्या माझे, सुटू देत प्राण
नको मागे उरायला, काहीही गहाण

वैकुंठाला निघालाय, भक्त एक भला ।।३।।

▪️सागरराजे निंबाळकर, कल्याण

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !