🙂 हरकत नाही..
कुणी गाळले, कुणी टाळले हरकत नाही
आयुष्य असे पुढे चालले हरकत नाही
वेळ काढून "भेटू आपण" पुन्हा एकदा
शब्द तुझे हे हवेत विरले हरकत नाही
कलियुग आहे इथे कुणीही निवांत नसतो
सोयीनुसार बसले, उठले हरकत नाही
नेटाने मी केली उठबस सगळ्यांची पण..
काही सुटले, काही चुकले हरकत नाही
सगेसोयरे नावापुरते केवळ "सागर"
जाणून सत्य दुःख वाटले हरकत नाही
▪️सागरराजे निंबाळकर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !