Friday, November 25, 2022

विश्वास आहे

~~ विश्वास आहे..

केली न सोबत मजला कुणीही
गर्दीत नाही अपुला कुणीही

वाटे हवासा आनंद केवळ 
दुःखात सांगा रमला कुणीही?

चिंतेत गुरफट होते मनाची
स्वच्छंद कायम जगला कुणीही?

सुटतोच संयम पाहून राशी
पैशापुढे ना टिकला कुणीही

घेऊन दर्शन गेले उभ्याने
देण्यास बळ ना बसला कुणीही

विश्वास आहे गातील "सागर"
मागे तुझ्या या गझला कुणीही

▪️सागरराजे निंबाळकर, कल्याण

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !