~~ वाचले कुणी नाही..
प्रश्न कैक होते पण.. ऐकले कुणी नाही
दोन थेंब अश्रूंचे झेलले कुणी नाही
रीत पाळण्यासाठी सर्व येत गेले पण..
सांत्वनास घटकाभर थांबले कुणी नाही
होत राहिले कौतुक फक्त चेहऱ्याचे या
काय सांगती डोळे वाचले कुणी नाही
शेवटी उगा टाहो आप्त फोडती सारे
मी जिवंत असताना बोलले कुणी नाही
वर्दळीत वावरलो रोज मी कितीदा पण..
जीव लावण्याजोगे भेटले कुणी नाही
▪️सागरराजे निंबाळकर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !