~~ सागर म्हणजे..
जीव अता मी लावत नाही
लावला तरी लागत नाही
मीच एकटा माझ्यासाठी
मला कुणाची सोबत नाही
हसू वाटले खुलून हसतो
अभिनय खोटा करवत नाही
स्पष्ट सांगतो जे आहे ते
उगा कुणाला झुलवत नाही
चंचल आहे स्वभाव माझा
एकाजागी थांबत नाही
विचारणे मी दिले सोडून
तीही काही सांगत नाही
आला तर ये जातो तर जा
बळजबरीने बसवत नाही
टाळशीलही एकवेळ तू
डोळे काही लपवत नाही
शंख-शिंपले बघून कळले
"सागर" म्हणजे दहशत नाही
▪️सागरराजे निंबाळकर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !