Friday, November 25, 2022

हृदयात नाही मी

~~ हृदयात नाही मी

तिच्या विश्वात नाही मी
तिच्या डोळ्यात नाही मी

कशासाठी रडावे जर..
कुण्या हृदयात नाही मी

मला दिसतोय शेवट पण..
तशा दुःखात नाही मी

हवे ते-ते दिले कायम
तरी लक्षात नाही मी

मला तेवत नका ठेऊ
दिव्याची वात नाही मी

▪️सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !