Sunday, November 6, 2022

आशेचा वावर

~~ आशेचा वावर

मनाचा मनाशी | छान मेळ व्हावा
लागावा सुगावा | आनंदाचा ||१||

आधी मी, आधी तू | नको खेचाखेची
दोरी एकतेची | धरू हाती ||२||

गुण आणि दोष | आहे प्रत्येकात
देऊयात हात | एकमेका ||३||

चारी दिशांमध्ये | आशेचा वावर
कुण्या एकावर | नको भार ||४||

अथांग "सागर" | निवांत किनारा
देतोय सहारा | कैक जीवा ||५||

▪️सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !