Sunday, November 27, 2022

कर नमन नेमाने

~ कर नमन नेमाने

ज्यांनी जन्म दिला त्यांची
तुला झाली अडगळ
संस्कारांनी असा कसा
आज गाठलाय तळ

ज्यांचे बोट धरले तू
बालपणी चालताना
दूर केलेस त्यांना तू
साथ हवी असताना

काय साधले नेमके
काय आहे तुझा हेतू?
सांग तरशील कसा
जर कोसळला सेतू

बाप असतो छप्पर
आई भिंत घरातली
एक रोखते तडाखा
दुजा होतसे सावली

त्यांच्या पायी चारीधाम
कर नमन नेमाने
अंश देऊन स्वतःचा
त्यांना धाडले देवाने

▪️सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !