Friday, October 28, 2022

खुशाली

▪️खुशाली..

मी दिवा तू वात झाली
रात्र ही तेजात न्हाली

चिंतनाचा हट्ट धरला
स्थैर्यता डोळ्यात आली

पाहुणा मी दो घडीचा
काय सांगावी खुशाली

एकटा पडलो कधी जर..
अक्षरे होतात वाली

युद्ध आहे संकटांशी
आसवांच्या सार ढाली

▪️सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !