वृत्त :- मनोरमा
पाहिले मी टाळताना
आसवांना गाळताना
आसवांना गाळताना
त्रास होतो माणसांना
अंधश्रद्धा पाळताना
अंधश्रद्धा पाळताना
राहिले ना भान काही
आठवांना चाळताना
आठवांना चाळताना
लाजली तू केवढी गे
मोगऱ्याला माळताना
मोगऱ्याला माळताना
हरवलो डोळ्यात इतुके
एकमेका भाळताना
एकमेका भाळताना
मूक होती शब्द सारे
वेदनांना साहताना
वेदनांना साहताना
*सागरराजे निंबाळकर*
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !