Wednesday, December 28, 2022

अंतर बरेच आले

▪️अंतर बरेच आले

माझ्या-तुझ्यात आता अंतर बरेच आले
पातक दुरावण्याचे दोघांकडून झाले

मी ग्रीष्म पोळणारा तू धार श्रावणाची
दोघांसही ऋतूंचे आंदण किती मिळाले

संशय मनात आला परका कुणी असावा
पण सोयरेच माझे मारेकरी निघाले

आजन्म सोबतीचा केला करार ज्यांनी
ताऱ्यांपरी अचानक एकेक ते गळाले

मी फार संयमाने हाताळले स्वतःला
आहे बराच चंचल तेव्हा कुठे कळाले

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !