▪️वाचतो..
चेहऱ्यांना वाचतो
दुःख सारे हेरतो
फक्त पैसा पाहिजे
मग कुणीही वाकतो
शक्य तितके रोज मी
आरशाशी बोलतो
फार काही मज नको
मोजके मी वेचतो
सावलीची आस पण..
कोण झाडे लावतो
तेच असते घर खरे
हर्ष जेथे नांदतो
काय झाले नेमके?
का असा तू वागतो
🌿 सागरराजे निंबाळकर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !