😊 गझलेत आहे मी
जरी तू झाकले डोळे तुझ्या नजरेत आहे मी
कितीही दूर केले तू तुझ्या समवेत आहे मी
कधी जर वाटले यावे पुन्हा भेटायला तर ये
जिथे भेटायचो पूर्वी तिथे वाटेत आहे मी
ठिकाणा एक असतो का कधी माझ्या लिखाणाचा
कधी कवितेत असतो तर कधी गझलेत आहे मी
उलट देऊ कसे उत्तर तुझ्याशी बोलताना मी
तुला मी मानतो अंतिम तुझ्या आज्ञेत आहे मी
म्हणवले ना कधीही मी स्वतःला तज्ज्ञ गझलेचा
मला आवड शिकायाची गझल शाळेत आहे मी
🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !