Saturday, December 3, 2022

अर्थ मौनातले

▪️अर्थ मौनातले

एकदा, दोनदा लाखदा वाचले
लागले ना तरी अर्थ मौनातले

शेवटी प्रेम ते प्रेम आई तुझे
वाचते तू सहज दुःख डोळ्यातले 

ताट होते पुढे मी भुकेला तरी..
कोण फकिरापुढे वाढते चांगले

दोष देऊ तरी मी कुणाला कसा
ओठही आपले दातही आपले

खूप पडतो फरक दोन ओळीतही
फक्त समजून घे शेर गझलेतले

🌿 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !