Sunday, January 9, 2022

सागर व्हावे..

🐋 सागर व्हावे..

सागर व्हावे, जगणे माझे
फेसाळू दे, असंख्य लाटा
थोडे वरती, थोडे खाली
तरी शेवटी, नाही घाटा

जरी चवीला, असला खारट
त्याच्याशिवाय, नाही रंगत
शंख शिंपले, सफेद वाळू
जणू भोजना, बसली पंगत

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !