▪️तुझ्यामुळे मी..
पाणी असून डोळ्यामध्ये हसलो होतो
तात्पुरता का होईना पण.. खचलो होतो
वर्षामागे वर्षे गेली तरी न खुलले
बनून याचक ज्या दाराशी बसलो होतो
चकवा समजा, विसराळू वा गुंग मतीचा
तिथेच आलो जिकडे पूर्वी फसलो होतो
विजय साजरा केला ज्यांनी सांगा त्यांना
हरलो नाही बस थोडासा थकलो होतो
शिक्षण होते, बुद्धी होती, तरी सांगतो
आई केवळ तुझ्यामुळे मी घडलो होतो
🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !