प्रत्येकाची तऱ्हा निराळी
क्षणाक्षणाला मनास जाळी
परंपरेच्या ओझ्याखाली
दबणे आहे कायम भाळी
मुलगी अखेर व्यक्ती असते
भेद कशाला गोरी-काळी
आलिंगन तर गोष्ट लांबची
दिली न त्यांनी साधी टाळी
ऐपत नव्हती म्हणून होतो
उभा कधीचा पाहत थाळी
येते-जाते दारी माझ्या
ऊन-सावली सांजसकाळी
🌿 सागरराजे निंबाळकर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !