Friday, January 7, 2022

भेट घेत जावी

🌿 भेट घेत जावी

भेट तुझी होता । मिळतो आधार
कमी होतो भार । निराशेचा ।।१।।

किमया करते । फक्त एक भेट
आलिंगन थेट । देता कोणी ।।२।।

प्रत्यक्ष भेटीचा । आनंद निराळा
मिळतो उजाळा । भावनांना ।।३।।

शक्य तितक्यांदा । भेट घेत जावी
संवाद प्रभावी । होतो त्याने ।।४।।

भेट तुझी आता । पुन्हा कधी राणी
डोळ्यातले पाणी । विचारते ।।५।।

कुणास ठाऊक । शेवटची भेट
घडावा समेट । सलोख्याने ।।६।।

▪️सागरराजे निंबाळकर, कल्याण

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !