Thursday, January 6, 2022

देईल तो साथ

🌿 देईल तो साथ..

ऋण मातीचे फेडाया
उभा जन्म खर्ची केला
घास उरला-सुरला
पावसाने तोही नेला

पुन्हा केली मशागत
दुःख लपवून आत
याच आशेवर एका
यंदा देईल तो साथ

▪️सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !