Friday, January 28, 2022

दिग्दर्शक मी

▪️ दिग्दर्शक मी..

लाख तालीम, करूनही का
पात्रे सगळी, उघडी पडली
भूमिका तशा, सोप्या होत्या
जमली नसेल, अदलाबदली

दिग्दर्शक मी, कथानकाचा
हवा तसा मग.., शेवट केला
प्रयोग झाला, पडला पडदा
जो-तो अपुल्या, वाटे गेला

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !