प्रीतीचे चांदणे
आरास दिव्यांची
माझिया मनास भावते
हळूच खुणावते
निशा !! १ !!
साजशृंगार तुझा
साथीला आभूषणे मौल्यवान
मानतो भाग्यवान
स्वतःला !! २ !!
प्रीतीच्या चांदण्यात
झाला मधुचंद्र साजरा
चेहरा लाजरा
सखीचा !! ३ !!
साथ तुझी
मज लाभली जीवनी
चंद्रास चांदणी
जशी !! ४ !!
टपोर चांदण्यांचा
पडला अंगणी प्रकाश
उजळला यथावकाश
संसार !! ५ !!
तळपत्या उन्हात
तुझी शीतल छाया
आपुलकीची माया
सावलीसारखी !! ६ !!
सागर सरितेच्या
पवित्र संगमात न्हाला
प्रीतीच्या चांदण्याला
मनोमिलन !! ७ !!
तुझ्या येण्याने
गेला पूर्णत्वास प्रण
चांदण्यांचा सण
दशदिशात !! ८ !!
@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !