Friday, October 7, 2022

उरेल का मग

~~ उरेल का मग..

अधूनमधून, येते झुळूक 
हळूच निघून जाते
झाले आहे, प्रत्येकाचे
असेच काही नाते

झरा आटला, नात्यामधला
संपत आहे माया
कधी न कळले, गेली इतकी
वेळ कशाने वाया

गुरफटलेला, दिसतो जो-तो
श्वास मोकळा नाही
शंका येते, उरेल का मग..
हातामध्ये काही?

★ सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !